Authors
Claim
कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे दर्शन घेऊन नमन केले.
Fact
व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर 2022 चा आहे. जेव्हा भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके दिल्लीतील गुरुद्वारा बांगला साहिब येथे आले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नाही.
कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते मुलाखत देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, पत्रकार मॅके यांना खलिस्तानी संघटनांबद्दल कॅनडाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारतात. प्रश्नाच्या उत्तरात मॅके यांनी उत्तर दिले की “कॅनडामध्ये ते सर्व धर्माच्या लोकांवर प्रेम करतात. कॅनडामध्ये सर्व धर्मांचे स्वागत आहे.”
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला सध्याचा म्हणत, असा दावा केला जात आहे की, भारताने हकालपट्टी केलेल्या कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले.
Fact Check/Verification
सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या संसदेत एक विधान केले आणि आरोप केला की शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकार असू शकते आणि त्यांच्या एजन्सी सक्रियपणे तपास करत आहेत. या विधानानंतर काही वेळातच कॅनडाने भारतीय मुत्सद्दी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली. भारतानेही कॅनडाच्या उच्चायुक्ताला बोलावणे धाडून डिप्लोमॅटला बडतर्फ करून प्रत्युत्तर दिले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल आम्ही Google वर काही कीवर्डच्या मदतीने शोध घेतला. या दरम्यान, आम्हाला मीडिया एजन्सी इंडिया टुडेने 2022 मध्ये प्रकाशित केलेल्या लेखात अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात काही उतारे सापडले.
अहवालानुसार, कॅमेरून मॅके गुरुद्वारा बांगला साहिबला भेट देण्यासाठी दिल्लीत होते, जिथे त्यांना खलिस्तानी संघटनांशी सामना करण्यासाठी कॅनडाच्या सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत याबद्दल विचारण्यात आले. न्यूज एजन्सी एशियन न्यूज इंटरनॅशनलने 27 ऑक्टोबर 2022 रोजी त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता.
आमचा तपास पुढे नेत आम्ही शोधले की भारताने कोणत्या मुत्सद्द्याला काढून टाकले आहे. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांच्या डिप्लोमॅटला पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे, असे वृत्त टाइम्स नाऊ या माध्यमाने दिले आहे. संबंधित डिप्लोमॅट चे नाव Olivier Sylvestre असल्याची माहिती मिळाली आहे.
Conclusion
आमच्या तपासणीत स्पष्टपणे दिसून आले आहे की व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर 2022 चा आहे जेव्हा भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके दिल्लीतील गुरुद्वारा बांगला साहिब येथे आले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ अलीकडचा नाही.
Result: False
Our Sources
Tweet made by ANI on October 27, 2022
Media report published by India Today on October 27,2022
(हे आर्टिकल न्यूजचेकर पंजाबीसाठी सर्वप्रथम शमिंदर सिंग यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in न्यूजचेकरचे चॅनल WhatsApp वर Live चालू आहे.