Fact Check
आरसीबी विजयानंतरचा जल्लोष म्हणून स्पेनमधील व्हिडीओ व्हायरल
Claim
आरसीबी विजयानंतरचे सेलिब्रेशन.
Fact
हा स्पेन मधील सॅन फर्मिन उत्सवाचा व्हिडीओ आहे.
जल्लोष असावा तर असा असे सांगत आरसीबीच्या विजयानंतर असा जल्लोष करण्यात आला, असे सांगणारा एक दावा सध्या व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षात संबंधित व्हिडीओ स्पेनमधील असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

“सेलिब्रेशन असा असावा, टाटा आयपीएल 2025 जिंकल्याबद्दल आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघाचे अभिनंदन! खरोखरच एक ऐतिहासिक विजय!” अशा कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत आहे.
Fact Check/Verification
व्हायरल व्हिडिओची बारकाईने पाहणी केली असता तो भारतातील कोणत्या शहरातील असेल असे वाटले नाही. यामुळे आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
दरम्यान हा व्हिडीओ Pamplona Fiesta नामक युट्यूब चॅनलने 2 जानेवारी 2024 रोजी अपलोड केला असल्याचे दिसून आले. कॅप्शनमध्ये, “स्पेनमधील पॅम्प्लोना येथे होणाऱ्या बैलांच्या धावण्याच्या ‘चुपिनाझो’ सप्ताहाचा उद्घाटन समारंभ.” असे लिहिलेले आहे.

व्हायरल व्हिडिओप्रमाणे गर्दी आणि आजूबाजूचा परिसर असणाऱ्या किफ्रेम्स असलेल्या आणि स्पेनमधील पॅम्प्लोना येथे होणाऱ्या उत्सवाची माहिती देणारे AP News, Aljazeera आणि Spain.info चे रिपोर्ट आम्हाला मिळाले.



या उत्सवाचे नाव सॅन फर्मिन असे आहे. हा स्पेनच्या उत्तर भागातील पाम्प्लोना शहरात दरवर्षी साजरा केला जातो आणि एक प्रसिद्ध पारंपरिक उत्सव आहे. दरवर्षी हा उत्सव शहराच्या संरक्षक संत फर्मिन यांचा सन्मान करण्यासाठी ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान आयोजित केला जातो. या उत्सवातील बैलांची शर्यत सर्वात प्रसिद्ध असून यात लोक शहरातील रस्त्यांवरून बैलांच्या पुढे धावत जातात. या साप्ताहिक उत्सवात लोक मिरवणुका, फटाके, संगीत, नृत्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आनंद लुटला जातो. जगभरातून हजारो पर्यटक हा आनंद लुटण्यासाठी पाम्प्लोना शहरात येतात. अशी माहिती आम्हाला मिळाली. या उत्सवाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर येथे पाहता येईल.

यावरून स्पेन मधील उत्सवाचा व्हिडोओ आरसीबी विजयानंतरचे सेलिब्रेशन म्हणून शेयर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
आरसीबीच्या विजयानंतर असा जल्लोष करण्यात आला असे सांगत स्पेन मधील सॅन फर्मिन उत्सवाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Sources
Video published by Pamplona Fiesta on January 2, 2024
News published by AP News on July 6, 2023
News published by Aljazeera on July 10, 2024
News published by Spain Info