Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.
Fact
व्हायरल दावा एडिटेड न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आला आहे. असे विधान किंवा मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही.
उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवणारे एबीपी माझाचे न्यूजकार्ड सध्या व्हायरल होत आहे. दावा आहे की, मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.
“या मुस्लिम धार्जिण्या माणसाच्या मानसिकतेला काय म्हणायचे? या माणसाने आता धर्मांतरण करावे.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे. दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही दाव्यातील न्यूजकार्डवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @abpmajhatv या एबीपी माझाच्या अधिकृत X खात्यावरून केलेली १८ मे २०२४ ची एक पोस्ट मिळाली.
“सगळे असे चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी, गद्दार जमवून त्यांना पूर्ण पडत नाहीत. म्हणून कोणीतरी एक आडनावाचा पाहिजे म्हणून तोही घेतलाय भाड्याने, बाबा.. दुपार झालीय आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, तरी असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको… : उद्धव ठाकरे” अशा कॅप्शनखाली ही पोस्ट आहे. त्यामधील न्यूजकार्डवर समान मजकूर आढळला.
दरम्यान व्हायरल न्यूजकार्ड आणि या पोस्टमधील न्यूजकार्डमध्ये एबीपी माझाचा लोगो, उद्धव ठाकरे यांचा फोटो, उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख आणि वेबसाईटचा अड्रेस वगळता मजकूर वेगळा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याचे तुलनात्मक परीक्षण केले, ते खाली पाहता येईल.
तुलनात्मक परीक्षणात व्हायरल आणि ओरिजनल न्यूजकार्डमध्ये प्रमुख मजकुरात बदल आढळला. दरम्यान व्हायरल न्यूजकार्डमध्ये वापरण्यात आलेल्या फॉन्ट मध्ये बदल दिसून आला.
अधिक तपासासाठी आम्ही सर्वप्रथम एबीपीने आपल्या अधिकृत वेबसाईट, X खाते किंवा फेसबुक पेजवर अशाप्रकारची कोणती पोस्ट केली आहे का? हे शोधले मात्र मूळ पोस्ट वगळता आम्हाला उर्दू भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासंदर्भातील उद्धव ठाकरेंची कोणतीही पोस्ट आढळली नाही.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी असे विधान केले असते तर त्यासंदर्भात सर्वच माध्यमांनी बातमी प्रसिद्ध केली असती, यादृष्टीने आम्ही Google वर कीवर्ड सर्च करून पाहिला मात्र आम्हाला तशी एकही बातमी आढळली नाही.
यामुळे अधिक तपासासाठी आम्ही सर्वप्रथम एबीपी माझा डिजीटलचे संपाद्क सचिन पाटील संपर्क साधला. फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांनी, “व्हायरल न्यूजकार्ड एडिटेड आहे, त्याच्यातील फॉन्ट वेगळा आहे, शिवाय उद्धव ठाकरेंनी उर्दू भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची मागणी किंवा विधान केल्याबाबत एबीपी माझाने कोणत्याच प्लॅटफॉर्मवर असे न्यूजकार्ड प्रसारित केलेले नाही.” अशी माहिती दिली.
आम्ही शिवसेनेच्या सोशल मीडिया खात्यांवरही धुंडाळून पाहिले. आम्हाला अधिकृत X किंवा फेसबुक पेजवर असे कोणतेही विधान, त्यासंदर्भातील पोस्टर किंवा व्हिडीओ आढळला नाही.
आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्याशीही संपर्क साधला. “व्हायरल दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.” अशीच माहिती दिली.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे, असे सांगणारा दावा खोटा आणि एडिटेड न्यूजकार्डच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by ABP Majha on May 18, 2024
Comparative analysis
Google Search
Conversation with Mr. Sachin Patil, Digital Editor, ABP Majha
Conversation with Adv. Harshal Pradhan, PRO, Shivsena UBT
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025