Authors
Claim
काँग्रेसने प्रियंका गांधी यांना अमेठीतून तर राहुल गांधी यांना रायबरेलीमधून लोकसभेचे उमेदवार बनवले आहे.
Fact
नाही, व्हायरल पत्र बनावट आहे.
काँग्रेस पक्षाचे एक कथित लेटरहेड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठी आणि राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल पत्र बनावट आहे. हे आर्टिकल लिहितोवर तरी काँग्रेस पक्षाने दोन्ही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल लोकसभा जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे आहे. या दोन जागांसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्याचवेळी भाजपने विद्यमान खासदार स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे, तर पक्षाने रायबरेली मतदारसंघासाठी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
व्हायरल होत असलेले लेटर हेड काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केले आहे असे सांगण्यात आले असून ते जारी करण्याची तारीख ३० एप्रिल २०२४ लिहिली आहे. त्याखाली उत्तर प्रदेशातील अमेठीतून प्रियांका गांधी आणि रायबरेलीमधून राहुल गांधी उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल पत्राची चौकशी करण्यासाठी Newschecker ने प्रथम काँग्रेस पक्षाचे अधिकृत X हँडल शोधले. आम्हाला राहुल किंवा प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही पत्र मिळाले नाही.
तथापि, आम्हाला ३० एप्रिल २०२४ रोजी जारी केलेली दोन पत्रे आढळली, जी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केली होती. एका पत्राद्वारे हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 4 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. दुसऱ्या पत्रात देवेंद्र यादव यांना दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची घोषणा करण्यात आली होती.
यानंतर आम्ही व्हायरल पत्राची तुलना काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या पत्राशी केली. आम्हाला दोन्ही पत्रात काही फरक आढळले, ज्यामुळे व्हायरल पत्र बनावट असल्याचे दिसून आले.
राहुल आणि प्रियंका गांधी यांना लोकसभेचे उमेदवार बनवण्याबाबत अलीकडील बहुतेक बातम्यांमध्ये असे म्हटले गेले आहे की अमेठी-रायबरेली जागेवर काँग्रेसचा सस्पेन्स कायम आहे.
आम्ही आमच्या तपासात काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म विंगच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांच्याशीही संपर्क साधला. या पत्राला त्यांनी बनावटही म्हटले आहे.
Conclusion
अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे जाहीर करणारे हे पत्र बनावट असल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप या जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
Result: False
Our Sources
Telephonic Conversation with Congress Leader Supriya Shrinet
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in