Friday, December 5, 2025

Fact Check

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

Written By Kushel Madhusoodan, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Nov 6, 2023
banner_image

Claim

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी काँग्रेसला मतदान करावे यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने 'फ्री रिचार्ज योजना' सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact

न्यूजचेकरच्या लक्षात आले की Whatsapp मेसेजमधील मजकूर आधीच्या फॉरवर्ड सारखाच होता, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी “तीन महिन्यांचे विनामूल्य रिचार्ज” ऑफर करत आहेत, असा दावा करण्यात आला होता. एका विशिष्ट टेम्पलेटचे अनुसरण यामागे स्कॅम असल्याचे दर्शविते.

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने 'फ्री रिचार्ज योजना' सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

न्यूजचेकरने “भाजपची मोफत रिचार्ज योजना” दावा खोडून काढला होता, अशी कोणतीही योजना नसल्याचे आढळून आले होते आणि Scam Detector, एक प्रमुख फसवणूक प्रतिबंधक संसाधनाद्वारे वेबसाइट संशयास्पद मानली गेली होती.

त्यानंतर आम्ही Whatsapp फॉरवर्डमध्ये दिलेल्या लिंकची पाहणी केली, ज्याने आम्हाला एका वेबसाइटवर (डावीकडे) आणले, जेथे “काँग्रेस फ्री रिचार्ज योजना” दाखविण्यात आली आहे. दुसरी लिंक, “गेट फ्री रिचार्ज करा”, असे सांगता मोबाईल क्रमांक विचारते. आधीच्या भाजपच्या दाव्यातील (उजवीकडे) वेबसाइटशी तुलना केल्यास ती समान रचना असल्याचे दिसून येते.

त्याचप्रमाणे, inc.in@congress.2024offer.com या URL ने आमच्या शंका वाढविल्या, कारण काँग्रेसची अधिकृत वेबसाइट https://www.inc.in/ अशी आहे. त्यानंतर आम्ही “काँग्रेस फ्री रिचार्ज योजना” साठी कीवर्ड शोध घेतला, आम्हाला अशा योजनेचे कोणतेही विश्वसनीय वृत्त किंवा अधिकृत विधाने मिळाली नाहीत. आम्ही या योजनेसाठी काँग्रेसची अधिकृत वेबसाइट देखील पाहिली, तेथेही आम्हाला अधिकृत माहिती आढळली नाही.

न्यूजचेकरला “2024offer.com” वेबसाइट Scam Detector द्वारे “अत्यंत संशयास्पद” असल्याचे आढळले आहे. ती सर्वात कमी विश्वासार्ह 3.9 क्रमांकांपैकी एक आहे, या वेबसाईटला ‘नवीन’, “असुरक्षित” आणि “चेतावणी” असे गणण्यात आले आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने 'फ्री रिचार्ज योजना' सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार “डोमेन नाव खूप नवीन आहे ही सर्वात मोठी समस्या आहे. त्याची नोंदणी काही दिवसांपूर्वीच झाली. यामुळे एका सुपर नवीन वेबसाइटला व्यवसाय उघडणे, त्याच्या सेवांचा प्रचार करणे, क्लायंटला त्या घेण्यास पटवणे, त्यांचा वापर करणे आणि नंतर ऑनलाइन पुनरावलोकने सबमिट करण्यासाठी वेळ काढणे जवळजवळ अशक्य होते. हे सर्व काही दिवसांचे आहे.”

आम्ही सायबरसुरक्षा तज्ञांशी संपर्क साधला आहे आणि आम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर हा लेख अपडेट करू.

Result: False

Sources
Analysis
Scam Detector review


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,439

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage