Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
हरिद्वार येथील अनाथाश्रमात मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली.
व्हिडिओमधील घटना हरिद्वारमधील अनाथाश्रमातील नाही. ही घटना उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील 'किशोरी बालिका विद्यालय' या खाजगी शाळेत घडली आहे. सतीश जोशी नावाच्या एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला न कळवता शाळेतून पळून गेल्याबद्दल बेदम मारहाण केली होती.
हरिद्वार येथील अनाथाश्रमात मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली, असे सांगत एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
“हरिद्वार चे एक अनाथ आश्रम!(आपले जेवढे ग्रुप असतील तेवढ्याना पाठवून द्या! त्या नालायकाला शिक्षा झालीच पाहिजे. पुर्ण देशभर गाजावाजा झाला पाहिजे.” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल दाव्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी प्राथमिक तपासात आम्ही संबंधित कीवर्ड्स गुगलवर शोधले. आम्हाला हिंदुस्थान आणि आज तक या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या ९ ऑक्टोबर २०२३ च्या बातम्या मिळाल्या. व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स वापरलेल्या या बातम्यांनी आम्हाला “उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील छजान गावातील गुरुकुल शाळेत ही घटना घडली जिथे सतीश जोशी नावाच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला न कळवता शाळेतून पळून गेल्याबद्दल बेदम मारहाण केली आणि शाळेच्या व्यवस्थापकांनी सतीश जोशीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली.” अशी माहिती दिली.
हरिद्वार उत्तराखंड या राज्यात येते. दरम्यान न्यूज रिपोर्टवरून ही घटना उत्तरप्रदेश येथे घडली असल्याचे निदर्शनास आल्यावरून आम्ही उत्तरप्रदेश पोलिसांनी या घटनेबद्दल काही स्पष्टीकरण दिले आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. आमच्या शोधात आम्हाला उत्तरप्रदेशच्या सीतापूर पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून ९ ऑक्टोबर २०२३ केलेले एक ट्विट मिळाले, ज्यामध्ये असे म्हटले होते की गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
आणखी तपास करताना व्हायरल व्हिडिओबद्दल हरिद्वार पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून २८ नोव्हेंबर २०२३ रोजी केलेले ट्विट आम्हाला सापडले. त्यामध्ये असे म्हटले आहे की, “व्हिडिओमधील घटना उत्तर प्रदेशातील आहे आणि ती हरिद्वारशी संबंधित नाही.”
अधिक माहितीसाठी आम्ही उत्तरप्रदेश पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरून संबंधित घटनेचा FIR शोधला. यामध्ये घटना घडलेल्या शाळेचा पत्ता किशोरी बालिका विद्यालय, सिधौली येथील शाळा आणि विद्यार्थ्याचे नाव दीपक असे नमूद करण्यात आले आहे.
यावरून घटना घडलेले ठिकाण एक खासगी शाळा असून अनाथाश्रम नसल्याचे स्पष्ट झाले.
अशाप्रकारे आमच्या तपासात हरिद्वार येथील अनाथाश्रमात एक मुलाला अमानुष मारहाण असे सांगत व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात उत्तरप्रदेश येथील एका खासगी शाळेतील मारहाणीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
News report published by Hindustan on October 9, 2023
News report published by Aaj Tak on October 9, 2023
Tweet made by Sitapur Police on October 9, 2023
Tweet made by Haridwar Police on November 28, 2023
Official Website of Uttarpradesh Police
Komal Singh
January 24, 2025
Prasad S Prabhu
September 14, 2024
Saurabh Pandey
September 23, 2023