Friday, September 27, 2024
Friday, September 27, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: बांगलादेशमध्ये वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारताचा असल्याचा खोटा दावा करून...

फॅक्ट चेक: बांगलादेशमध्ये वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारताचा असल्याचा खोटा दावा करून होतोय शेअर

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
ट्रेनमध्ये वृद्धाला मारहाणीनंतर मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ पुढे आला आहे.
Fact

वृद्धाला मारहाण होत असतानाचा व्हायरल व्हिडीओ बांगलादेश येथील असून खोट्या दाव्याने शेयर केला जात आहे.

एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेच महाराष्ट्रात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर या व्हिडिओला जातीय रंग देऊन शेअर केले जात असून महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर भारतातील एका मुस्लिम व्यक्तीला पुन्हा मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: बांगलादेशमध्ये वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारताचा असल्याचा खोटा दावा करून होतोय शेअर
Courtesy: FB/ समर्थक आनंद माली

दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.

“महाराष्ट्र के ट्रेन वाले बुजुर्ग का मामला अभी ठंडा भी नहीं हुआ था कि ये दूसरा वीडियो सामने आ रहा है जिसमें एक विशेष समाज का आदमी मुस्लिम बुजुर्ग को बुरी तरह पीट रहा है? अब इस तरह की वीडियो देखकर दर्द नहीं होता क्युकी अब देखते ही रहते हैं? मुस्लिम बुजुर्ग की दाढ़ी नोची तमाचा मारा टोपी सर से गिरा दिया… ” असे व्हायरल दावा सांगतो.

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी, आम्ही ‘इनव्हिड टूल’चा वापर केला आणि Google लेन्सद्वारे व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स ‘रिव्हर्स सर्च’ केल्या. आम्हाला ८ सप्टेंबर २०२४ रोजी बांगलादेशी न्यूज चॅनल ‘जमुना टीव्ही’ च्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल व्हिडिओशी संबंधित रिपोर्ट सापडला.

व्हिडिओच्या वर्णनात दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ बांगलादेशच्या बारगुना येथील आहे, जिथे जुबा दल नेता इफ्तिखार आलम शॉन मोल्ला याने अब्दुर रशीद नावाच्या वृद्धाला मारहाण केली. अब्दुर रशीद हे माजी स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सांगण्यात आले. येथे क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहता येईल.

तपासादरम्यान, आम्हाला ढाका पोस्टच्या वेबसाइटवर या घटनेशी संबंधित ९ सप्टेंबर २०२४ रोजीचा एक रिपोर्ट देखील सापडला.

फॅक्ट चेक: बांगलादेशमध्ये वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारताचा असल्याचा खोटा दावा करून होतोय शेअर
Courtesy: Dhaka Post

बरगुना येथे ८ सप्टेंबर रोजी बीएनपीचे माजी जिल्हाध्यक्ष फारुक मोल्ला यांचा मुलगा शॉन मोल्ला याने माजी स्वातंत्र्यसैनिक कमांडर अलहाज मोहम्मद अब्दुर रशीद मियाँ यांच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. फारुख मोल्ला म्हणतात की राशिद मिया यांनी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अनेकदा टिप्पणी केली होती. त्याचवेळी रशीद मिया यांनी पत्रकारांना सांगितले की, आपण उपायुक्त कार्यालयात जात असताना शॉन मोल्ला आणि त्याचे काही साथीदार आले आणि गैरवर्तनाचा आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण केली. असे हा रिपोर्ट सांगतो.

बांगलादेशातील अन्य माध्यमांनीही यासंदर्भात वृत्त प्रसारित केले असून ते इथे, इथे आणि इथे पाहता येईल.

खरे तर महाराष्ट्रात गेल्या महिन्यात गोमांसाच्या संशयावरून काही लोकांनी एका वृद्धाला चालत्या ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ठाणे जीआरपीने संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता. आता या घटनेला जोडत भारतातच मारहाण झाल्याचे सांगून बांगलादेशचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. महाराष्ट्रात घडलेल्या घटनेबद्दलचे वृत्त येथे क्लिक करून वाचता येईल.

Conclusion

वृद्धाला मारहाण होत असलेला व्हायरल व्हिडीओ भारतातील नसून बांगलादेशातील असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google Search
News published by Jamuna TV on September 8, 2024
News published by Dhaka Post on September 9, 2024
Several Media Reports


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular