Thursday, July 10, 2025

Fact Check

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Jul 31, 2024
banner_image

Claim
मुंबईच्या धारावीमध्ये पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादीने हत्या करतानाचा व्हिडीओ.
Fact
हा दावा खोटा आहे. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील पलानाडू जिल्ह्यातील विनुकोंडा येथील आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध एका माणसाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एका मुस्लीम जिहादीने मुंबईतील धारावीमध्ये बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची निर्घृणपणे हत्या केली. असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओ सुमारे 24 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. यादरम्यान त्याचा हातही कापला जातो. या हल्ल्यात ती व्यक्ती बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडताना दिसून येते.

व्हिडिओ सोबत पुढील कॅप्शन पाहायला मिळते. “मुंबई मधील धारावी क्षेत्रात हिंदु समाज हा अत्यंत संकटात आहे. कायद्याचे रक्षक म्हटले जाणाऱ्या पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादी लांड्याने निर्घृणपणे हत्या केली. आता संकट दारात आलंय हिंदुंनो वेळीच सावध व्हा. अन्यथा वर्तमान आणि भविष्यकाळ फार भयानक असेल हे नक्की….”

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल
Courtesy: X@Niranja47114538

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल

Fact Check/Verification

Newschecker ने व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेमच्या मदतीने रिव्हर्स इमेज शोध केला. यावेळी, आम्हाला वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते अर्जुन रेड्डी यांच्या एक्स अकाउंटवरून केलेले एक ट्विट आढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ होता. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये तो विनुकोंडाचा असल्याचे म्हटले आहे.

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल
Courtesy: X//ArzunReddeYSRCP

संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केल्यावर, आम्हाला दैनिक भास्करने 18 जुलै 2024 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. यामध्येही व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दृश्ये होती.

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल
Courtesy: Dainik Bhaskar

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पलानाडू जिल्ह्यातील विनुकोंडा येथे 17 जुलैच्या रात्री वायएसआर काँग्रेसशी संबंधित शेख रसीद यांच्यावर स्थानिक टीडीपी नेते शेख जिलानी यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शेख रशीद गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शेख रशीद यांच्या हत्येप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली होती.

या व्यतिरिक्त, आम्हाला या संदर्भात 19 जुलै 2024 रोजी इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील आढळला. 17 जुलै रोजी पलानाडू जिल्ह्यातील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या शेख रसीद यांच्यावर विनुकोंडा येथील मंडलमंडी बसस्थानकाजवळ हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ही हत्या जिलानी नावाच्या व्यक्तीने केली आहे, जो कथितपणे तेलुगू देसम पक्षाचा सदस्य आहे.

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल
Courtesy: Indian Express

तथापि, जिल्ह्याचे एसपी के श्रीनिवास राव यांनी या घटनेत कोणताही राजकीय कोन असल्याचे स्पष्टपणे नाकारले आणि सांगितले की आरोपी आणि पीडित दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते आणि काही मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद होते. त्याचवेळी विनुकोंडा पोलीस ठाण्याने हे प्रकरण मालमत्तेच्या वादाशी संबंधित असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणी द हिंदूच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला एक रिपोर्टही सापडला, ज्यामध्ये टीडीपीने आरोपी एसके जिलानी आपल्या पक्षाशी संबंधित असल्याचा दावा फेटाळून लावला होता. टीडीपीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टमध्ये म्हटले होते की आरोपी आणि पीडित दोघेही वायएसआर काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत आणि दोघेही वायएसआरचे शक्तिशाली नेते पीएस खान यांचे समर्थक आहेत आणि दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल

मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून या दाव्याचे खंडन केले असून “सध्या वेगवेगळ्या समाज माध्यमांवर एक इसम दुसऱ्या इसमावर कोयत्याने वार करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून दोन दिवसांपूर्वी मुंबई मध्ये घडलेल्या घटनेचा असल्याचे सांगितले जात आहे. सदर व्हिडीओ मधील घटना मुंबई मध्ये घडलेली नसून सदरचा व्हिडीओ हा मुंबईमधील कोणत्याही घटनेचा नाही. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” असे आवाहन केले आहे.

यानंतर आम्ही विनुकोंडा पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर एस सांबशिवा राव यांच्याशीही संपर्क साधला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.

दिल्लीतील सरायकाले खान येथे जावेदने रोहित नावाच्या व्यक्तीची हत्या केली तेंव्हाचा व्हिडीओ असे सांगत हाच व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता, त्यावेळी न्यूजचेकर हिंदीने केलेले फॅक्टचेक आपण इथे वाचू शकता.

Conclusion

आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विनुकोंडा येथील आहे, जिथे शेख जिलानी नावाच्या व्यक्तीने शेख रशीद नावाच्या व्यक्तीचा रस्त्याच्या मधोमध खून केला होता.

Result: False

Our Sources
Tweet by YSRCP leader Arjun Reddy on 18th July 2024
Article Published by Dainik Bhaskar on 18th July 2024
Article Published by The Hindu on 18th July 2024
Article Published by Indian Express on 19th July 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

18,924

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage