Authors
Claim
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत.
Fact
हा दावा खोटा आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे बुधवार दि. १७ रोजी राम नवमीला स्थानिक महिलेने बनविलेल्या शाकाहारी सावजी भोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राम नवमीला मटण खाल्ले, असे सांगत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्हाला X वर एका मराठी युजरने केलेला दावा सापडला. यामध्ये “रामनवमीला मटण खाणारा नकली #धर्मवीर” अशा कॅप्शनखाली मुख्यमंत्र्यांचा एक फोटो जोडण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे http://curlytales.com च्या एडिटर इन चीफ कामिया जानी यांच्यासोबत भोजन करताना दिसत आहेत.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
आम्हाला सापडलेल्या आणखी एक मराठी X युजरने केलेल्या दाव्यात “धर्म वैगेरे सगळं ह्यांच्यासाठी धंदा आहे…बाकी तुम्ही हुशार आहातच..मोदी काय किंवा शिंदे काय एकाच माळेचे मनी आहेत…रामनवमीला मटण कोण खातं? #मटण #चिकन #शिंदे…. असा हा धर्मवीर” असे म्हटले आहे.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
याच विषयावर आम्हाला इतर भाषेतही अनेक दावे सापडले. X वरील @PriaINC या व्हेरीफाईड हॅन्डलने केलेल्या इंग्रजीतील दाव्यात “Shocking. CM of Maharashtra Mr. Shinde savouring Nagpur’s Savji mutton on the auspicious day of Ram Navami. Today CM was in Nagpur for election campaign. Just yesterday PM was moaning about opposition leaders eating meat & how Hindu sentiments are hurt blah blah: Today BJP appointed CM feasting on meat that too on auspicious Hindu festival of Ram Navami. All Anti Hindus are found in BJP.” असा मजकूर आढळला.
Fact Check/ Verification
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम नवमीला सावजी मटण खाल्ले असे सांगणाऱ्या दाव्याची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम दाव्यातील फोटोची पाहणी केली. फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगर तसेच कर्ली टेल्स च्या एडिटर इन चीफ कामिया जानी मुख्यमंत्र्यांसोबत बसलेल्या आढळल्या. दरम्यान फोटोचा मुख्य स्रोत शोधण्याचा निर्णय घेऊन आम्ही संबंधित फोटोवर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला फोटोचा मुख्य स्रोत सापडला नाही. मात्र याच फोटोचा वापर करून अनेक युजर्सनी याचसंदर्भात विविध भाषेमध्ये केलेले दावे आम्हाला पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया खात्यांवर काही माहिती दिली आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे X आणि फेसबुक खाते आम्ही शोधून पाहिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कोठे उल्लेख केल्याचे आढळले नाही.
दरम्यान फोटोत दिसणाऱ्या कामिया जानी यांनी यासंदर्भात कोणती पोस्ट केली आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही त्यांचे X आणि वैयक्तिक इंस्टाग्राम, त्यांच्या कर्ली टेल्स चे X आदी खाती धुंडाळून पाहिली. दरम्यान इंस्टाग्राम खात्यावर आम्हाला १८ एप्रिल २०२४ म्हणजे आजच्याच दिवशी पोस्ट केलेली रील सापडली. ज्यामध्ये व्हायरल फोटोमध्ये असलेले वातावरण आम्हाला पाहायला मिळाले.
या पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
“Authentic Veg Saoji Meal With CM Eknath Shinde” या कॅप्शनखाली बनविण्यात आलेली ही रील पाहायला मिळाली. या रिल बद्दल माहिती देताना “On the auspicious day of Ram Navami, I enjoyed a very hearty veg saoji meal with Maharashtra’s CM Shri Eknath Shinde.📍Umred, Maharashtra. Local women of the village prepared a very special veg saoji meal for us and it was super delicious. Stay tuned for the whole episode!” अशी माहिती देण्यात आली आहे. “रामनवमीच्या शुभ दिवशी, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अगदी मनसोक्त व्हेज साओजी जेवणाचा आस्वाद घेतला.📍उमरेद, महाराष्ट्र. गावातील स्थानिक महिलांनी आमच्यासाठी अतिशय खास व्हेज साओजी जेवण तयार केले आणि ते खूप स्वादिष्ट होते. संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी ट्यूनड राहा” असा त्याचा अर्थ आम्हाला वाचायला मिळाला.
कर्ली टेल्स च्या कामिया जानी अशापद्धतीने सेलेब्रिटी आणि राजकीय व्यक्तींसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांच्याशी चर्चा करतात. सर्वप्रथम कार्यक्रमाचा टिझर इंस्टाग्राम वरून प्रसिद्ध केला जातो. संपूर्ण एपिसोड युट्युबवर त्या घालतात. यांच स्वरूपाचा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागपूर जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत करण्यात आला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. दरम्यान यासंदर्भातील माहिती देताना शुद्ध सावजी भोजनाचा आस्वाद घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ पाहतानाही याची कल्पना येते.
या पदार्थांची नावे काय? अशा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदार्थ दाखवत असतांना वांग्याचे भरीत, वांग्याची भाजी, पातोडी आदी शाकाहारी पदार्थांची नावे घेत असताना पाहायला आणि ऐकायला मिळतात.
यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम नवमीला मांसाहार केला अथवा मटण खाल्ले असे सांगणारा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
Conclusion
यावरून आमच्या तपासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे बुधवार दि. १७ रोजी राम नवमीला स्थानिक महिलेने बनविलेल्या शाकाहारी सावजी भोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला होता.
Result: False
Our Sources
Google Search
Social Media Handles of CM Eknath Shinde
Reel published by Kamiya Jain on April 18, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा