Sunday, September 1, 2024
Sunday, September 1, 2024

HomeFact CheckFact Check: खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली? खोटा...

Fact Check: खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली? खोटा आहे हा दावा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली.
Fact
आपल्या कानातलेही हिसकावून घेतले असे एक महिला सांगत असताना खासदारांनी स्वतःच्या कानाला हात लावला होता. त्याचा विपर्यास करून खोटा दावा केला जात आहे.

कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. विशेषतः कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना तसे करायला लावले असे हा दावा सांगतो.

Fact Check: खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली? खोटा आहे हा दावा
Courtesy: X@SunainaHoley


दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

विशाळगड किल्ला परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या बाजूने निघालेल्या रॅलीला जातीय वळण लागल्यानंतर आणि दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन दिवसांनी नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराजांनी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत 16 जुलै रोजी विशाळगडला भेट दिली. विशाळगड किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर या मुस्लिमबहुल गावावर जमावाने हल्ला केला होता, त्याच्या पाहणीसाठी खासदारांनी भेट दिली होती.

यानंतर हे दावे व्हायरल होण्यास सुरुवात झाली असून, “हे बघा टिनपाट @satejp ने काँग्रेस खासदार शाहू महाराजांना मुसलमानांसमोर कान धरून माफी मागायला लावली.. का तर मुस्लीम मतं मिळाली आहेत म्हणून जिंकलेत निवडणुकीत..उद्या नाक घासायला लावतील लिहून घ्या..छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणं हे फक्त रक्तात असेल तरच शक्य आहे. दत्तक धुळीतच मिळवतील आणि मिळवलाच धुळीत..@YuvrajSambhajiतुम्हाला पटतंय का हे सगळं?” असे या दाव्यामध्ये म्हटलेले आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल झालेल्या चित्रावर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @Anand_Dasa88 या व्हेरीफाईड युजरने केलेले ट्विट सापडले, ज्याने म्हटले की व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला काँग्रेस खासदाराकडे तक्रार करत आहेत की कोणीतरी त्यांचे कानातले चोरले आहे, त्यानंतर शाहू छत्रपतींनी स्वतःच्या कानाला हात लावून प्रतिक्रिया दिली.

याची पुष्टी करण्यासाठी, आम्ही YouTube वर संबंधित कीवर्ड शोध घेतला आणि इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई तक या मराठी वृत्तवाहिनीने अपलोड केलेला व्हिडिओ आमच्या समोर आला. शाहू छत्रपती कानाला हात लावून महिलेच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना दाखवणारा व्हायरल भाग 1:38 मिनिटांच्या आसपास पाहिला जाऊ शकतो.

बारकाईने ऐकल्यानंतर की, ती महिला सांगत होती की रॅलीत आलेल्या लोकांनी दुसऱ्या महिलेच्या घरात घुसून तिच्या कानातील झुमके हिसकावले. ती म्हणते “इसके घर मे घुस कर इसके कानसे इसका निकल लिए…”. (“ते तिच्या घरात घुसले, आणि नंतर तिच्या कानातून (तिच्या कानातले) हिसकावून घेतले.) यानंतर, शाहू छत्रपती स्वतःच्या कानाला हात लावताना आणि त्याच्या शेजारी असलेल्या आमदार सतेज पाटील यांच्याशी संवाद साधताना दिसतात.

व्हिडिओच्या वर्णनात ते गजापूर गावात चित्रित करण्यात आले आहे असे म्हटले आहे. हे ते ठिकाण आहे जिथे आधी सांगितल्याप्रमाणे 14 जुलै रोजी स्थानिकांवर जमावाने हल्ला केला होता आणि जाळपोळ आणि दगडफेक केली होती.

ABP माझा ने सुद्धा यासंदर्भात प्रसारित केलेले वृत्त याठिकाणी वाचू शकता.

यावरून खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कानाला हात लावून माफी मागितल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली असे सांगणारा दावा खोटा आहे. आपल्या कानातलेही हिसकावून घेतले असे एक महिला सांगत असताना खासदारांनी स्वतःच्या कानाला हात लावला होता. त्याचा विपर्यास करून खोटा दावा केला जात आहे.

Result: False

Our Sources
Tweet made by X user @Anand_Dasa88 on July 18, 2024
News published by Mumbai Tak on July 16, 2024
News published by ABP Maza on July 18, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular