Sunday, June 30, 2024
Sunday, June 30, 2024

HomeFact CheckFact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा...

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण केली आणि काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
Fact

2018 मध्ये जैन मुनी उपाध्याय मयंक सागरजी महाराज यांना दुचाकीने धडक दिली होती त्या प्रसंगाचा फोटो वापरून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे
WhatsApp Viral Message

“कर्नाटकमध्ये एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण केली, ‘काँग्रेस झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, आता काँग्रेस खऱ्या रूपात आली आहे, ज्या हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले आहे. असेच प्रेम देत रहा हा फोटो इतका पाठवा की उद्या नरेंद्र मोदीजी आणि योगीजींपर्यंत पोहोचेल…” असे हा दावा सांगतो.

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी आम्ही व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 21 मार्च 2018 रोजी Bangalore Mirror ने प्रसिद्ध केलेले वृत्त आढळले. त्या वृत्तानुसार, “जैन मुनी मयंक सागर यांच्यावर कर्नाटकातील मुस्लिम तरुणांनी हल्ला केल्याची बातमी खोटी आहे. वास्तविक 13 मार्च रोजी अहिंसा क्रांती या जैन प्रकाशनात खरी बातमी प्रकाशित झाली आहे. श्रवणबेळगोळ येथून ते परतत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. ही घटना कनकपुरजवळ घडली असून त्यात मुस्लिम तरुणांचा सहभाग नव्हता.”

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे
Bangalore Mirror report

या बातमीच्या आधारे, आम्ही अहिंसा क्रांती यावर शोध घेतला आणि 13 मार्च 2018 रोजी फेसबुक वरील “अहिंसा क्रांती समाचार” या पेजवर आम्हाला एक पोस्ट सापडली. “उपाध्याय मयंक सागर जी महाराज यांना दुचाकीने धडक दिली, त्यांच्या खांद्याला दुखापत झाली, त्यांची प्रकृती आता ठीक आहे,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच एक फोटोही शेयर केला होता आणि तो व्हायरल होत असलेल्या फोटोशी मिळता जुळता आहे.

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे
Ahimsa Kranti Samachar Post

त्यानंतर, आम्ही Google वर अधिक शोध घेतला. द हिंदूने 30 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त आम्हाला मिळाले. ‘पोस्टकार्ड न्यूज’ या ऑनलाइन पोर्टलचे सह-संस्थापक महेश विक्रम हेगडे यांना सीसीबी पोलिसांनी बनावट आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील बातम्या पसरवल्याच्या आरोपाखाली गुरुवारी अटक केली. 19 मार्च रोजी हेगडे यांनी नुकतेच एका रस्ता अपघातात जखमी झालेल्या जैन भिक्षू उपाध्याय मयंक सागरजी महाराज यांचा फोटो ट्विट केला होता, त्याला कॅप्शन दिले होते: “कर्नाटकमध्ये काल एका जैन मुनीवर मुस्लिम तरुणांनी हल्ला केल्याची अत्यंत दुःखद बातमी आहे. सिद्धरामय्या यांच्या कर्नाटकात कोणीच सुरक्षित नाही,”

Fact Check: कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण करून काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या? पाहुयात सत्य काय आहे

31 मार्च 2018 रोजी, डेक्कन क्रॉनिकलनेही अशाच प्रकारची घटना नोंदवली आहे. CCB पोलिसांनी पोस्टकार्ड न्यूजच्या महेश विक्रम हेगडेला जातीय भावना भडकावणाऱ्या बनावट ट्विटसाठी अटक केली. हेगडे यांनी उपाध्याय मयंक सागर जी महाराज यांचा फोटो जोडला आणि लिहिले होते की, “सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे काल कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिम तरुणांनी हल्ला केला. सिद्धरामय्या यांच्या कर्नाटकात कोणीही सुरक्षित नाही.”

2023 मध्ये कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांनंतर, “कर्नाटकातील जैन मुनींवर हल्ला” असा दावा असलेल्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्या गेल्या होत्या, ज्या खोट्या असल्याचे न्यूजचेकरने केलेल्या फॅक्टचेक मध्ये आढळले होते.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासानुसार, कर्नाटकात एका जैन साधूला मुस्लिमांनी मारहाण केल्याचे आणि काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Result: False

Our Sources
Report By Bangalore Mirror, Dated: March 21, 2018
Facebook Post By Ahimsa Kranti Samachar, Dated: March 13, 2018
Report By The Hindu, Dated: March 30, 2018
Report By Deccan Chronicle, Dated: March 31, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular