Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
कर्नाटक सरकारने महिलांसाठी मोफत प्रवास योजना सुरु केलेली असताना चालकाने घराजवळ बस थांबविण्यात न आल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली.
Fact
हा दावा खोटा आहे. सुरत येथे मॉब लिंचिंग विरोधातील आंदोलन भडकल्यातून हा प्रकार घडला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी पाच मतदानपूर्व हमी लागू केल्या होत्या. त्यापैकी एक शक्ती योजना आहे, जी महिलांना मोफत बस प्रवास देते. शक्ती योजना लागू होताच सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि दावे फिरवले गेले. असाच आणखी एक दावा समोर आला आहे. कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली असताना… मुस्लिम जमावाने बस फोडली असे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
फेसबुकवर आढळलेल्या या दाव्यात असे लिहिले आहे की, “कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एका मुस्लिम महिलेने बस तिच्या घराजवळ थांबवण्यास सांगितले. पण त्यांनी बस थांबवली नाही. याचा परिणाम काय होतो ते तुम्हीच पहा.”
वस्तुस्थिती शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स काढल्या. त्यावर शोध घेताना ही कर्नाटक बस नसल्याचे आढळून आले. त्याचं कारण असं की, बस बारकाईने पाहिली असता समोरच्या बाजूला अस्पष्ट गुजराती भाषा असल्याचे दिसून आले. आम्हाला बसच्या डाव्या बाजूला पाठीमागे इंग्रजीत “सिटी लिंक” असे लिहिलेलेही दिसले.
याचा पुरावा म्हणून विचार करून, आम्ही Google वर कीवर्ड शोध घेतला. आम्हाला गुजरात च्या सुरतमध्ये सिटी लिंक नावाची बससेवा असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर, आम्ही कीवर्डसह शोधले आणि त्याचे परिणाम सापडले.
6 जुलै 2019 रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, “देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधात आयोजित केलेल्या निषेधादरम्यान सुरत शहरातील एका संघटनेने दगडफेक सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी जमावबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर केला.”
5 जुलै 2019 च्या न्यूज18 च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “मॉब लिंचिंगच्या विरोधात सूरतमधील निदर्शनास हिंसक वळण लागले आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी हवेत गोळीबार केला आणि अश्रूधुराचा वापर केला.”
5 जुलै 2019 रोजी, TV9 गुजरातीच्या यूट्यूब चॅनलवरही या घटनेचे वृत्तांकन करण्यात आले आहे, सुरतमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनांविरोधात रॅली शीर्षकाच्या बातमीत निषेधाला हिंसक वळण लागले, बसेसवर दगडफेक हिंसक झाली. असे म्हटले असून व्हायरल व्हिडिओत फुटेजमध्ये दिसत असलेल्या बसवर दगडफेक होतानाचे फुटेज येथे पाहायला मिळते.
या पुराव्यानुसार, कर्नाटकात मोफत सुविधेची बस एका मुस्लिम महिलेने तिच्या घराजवळ थांबवण्यास सांगितले. पण ते थांबले नाहीत. त्याचा हा परिणाम झाला असे म्हणणे खोटे आहे. सुरतमध्ये मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ हिंसक वळण घेत असताना ही घटना घडली असून तेंव्हाचा व्हिडीओ दिशाभूल करीत व्हायरल करण्यात आला आहे.
Our Sources
Report By Times Of India, Dated: July 6, 2019
Report By News18, Dated: July 5, 2019
YouTube Video By Tv9 Gujarati, Dated: July 5, 2019
(हे आर्टिकल न्यूजचेकर कन्नड साठी सर्वप्रथम ईश्वरचंद्र बी. जी. यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in न्यूजचेकरचे चॅनल WhatsApp वर Live चालू आहे.
Vasudha Beri
May 16, 2025
Prasad S Prabhu
October 1, 2024
Komal Singh
September 17, 2024