डाॅक्टर कोरोना रुग्णाला गळा दाबून मारत असल्याचा दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती खाटेवर झोपून आहे तर दुसरा मास्क लावलेला व्यक्ती त्याच्याशी झटापट करताना दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या नावाखाली लोकांना मारत आहेत. हा व्हिडिओ एवढा शेअर करा की, डाॅक्टर पकडला गेला पाहिजे.
आमच्या अनेक वाचकांनी हा व्हिडिओ आमच्याकडे पडताळणी साठी पाठवून याची सत्यता तपासणी करण्यास सांगितले आहे.
हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास यात tu_mazi_jaanu या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव दिसत आहे. आम्ही या इंस्टाग्राम अकाउंटला भेट दिली असता आम्हाला हा व्हिडिओ या अकाउंटवर शेअर केल्याचे आढळून आले. हा लेख लिहीपर्यंत 92,227 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

हा व्हिडिओ आम्हाला आणखी एका इंस्टाग्राम अकाउंटवर आढळून आला. यात देखील हाच दावा करण्यात आला आहे की, कोरोना रुग्णाला मारणारा डाॅक्टर पकडला गेला पाहिजे.

Fact Check/Verification
डाॅक्टरने खरंच कोरोना रुग्णाला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र असा प्रकार घडल्याची बातमी आम्हाला आढळून आली नाही. मग हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेजचा आधार घेतला असता हा व्हिडिओ फेसबुकवर मागील वर्षी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असल्याचे आढळून आले. शेअर करण्यात आलेल्या पोस्टमधील मजकूर बंगाली भाषेत होता.

अशीच एक फेसबुक पोस्ट 14 मे 2020 रोजी अपलोड केल्याचे आढळून आले. आम्ही या पोस्टमधील मजकुराचा अनुवाद केला. या सर्व पोस्टमध्ये म्हटले आहेत की वडील आजारी आहेत म्हणून मुलगा दवाखान्यात वडिलांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. हा मुलगा कलंक आहे.

या व्हिडिओबाबत अधिक शोध घेत असताना आम्हाला युट्युबवर बांग्लादेशी युट्युबर सायेम शिरीन यांचा यासदंर्भात एक व्हिडीओ आढळून आला. त्यांनी या व्हिडिओची सत्यता सत्यता समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी म्हटले आहे की, व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की तो मुलगा वडिलांचा गळा दाबत नसून जबरदस्तीने गोळी तोंडात भरवत आहे. त्याचा हात वडिलांच्या गळ्याजवळ नसून तोंडाजवळ आहे.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ डाॅक्टरने कोरोना रुग्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा नाही तर बांग्लादेशातील एका मुलाने आपल्या आजारी वडिलांना जबरदस्तीने गोळ्या खाऊ घातल्याचा आहे.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Result: Misleading
Claim Review: डाॅक्टरने कोरोना रुग्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
Our Sources
Sayem Shirin Vlog– https://www.youtube.com/watch?v=6qHDrneGE8s&t=188s
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.