महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे HIV/AIDS पाॅझिटिव्ह असल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि ट्विटरवर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला व्हाट्सअॅपर हा स्क्रीनशाॅट पाठविला असून याची शहानिशा करण्याची विनंती केली आहे
हिंदी वृत्तवाहिनी टिव्ही 9 भारतवर्षच्या बातमीचा हा स्क्रीनशाॅट असून यात म्हटले आहे की, सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे HIV/AIDS पॉजिटिव

Fact check / Verification
राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे HIV/AIDS पाॅझिटिव्ह आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र आम्हाला कुठेही ही बातमी आढळून आली नाही. एवढी मोठी बातमी लपून राहणे शक्य नाही त्यामुळे आम्ही अधिक शोध सुरु केला.
या शोधा दरम्यान आम्हाला टिव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ यूट्युबवर आढळून आला. यात म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच या व्हिडिओत व्हायरल स्क्रीनशाॅट प्रमाणेच स्क्रीनशाॅट आहेत मात्र यात “सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे कोरोना पॉजिटिव” असा मजकूर आहे. यावरुन स्पष्ट होते की, टिव्ही 9 भारतवर्षच्या बातमीचा स्क्रीनशाॅट एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे. कोराना” शब्दाच्या जागेवर “HIV/AIDS” असे लिहिण्यात आले आहे.
आपण व्हायरल स्क्रीनशाॅट आणि बातमीतील मूळ स्क्रीनशाॅटची तुलना खाली पाहू शकता.

याशिवाय आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात म्हटलं आहे की, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून आदित्य यांनीच ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सौम्य लक्षणे जाणवत असल्याने मी करोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये, असे आवाहनही आदित्य यांनी केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस २५ हजारावर नवीन बाधितांची नोंद झाली आहे. या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारीक लक्ष ठेवून आहेत. सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात आहे. त्यातच त्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोना संसर्गाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. करोनाची लागण झालेले आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत. असेही माहिती मटाच्या बातमीत दिली आहे.
याशिवाय आम्हाला आदित्य ठाकरे यांचे ट्विट देखील आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
Conclusion
आमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIV/AIDS ची लागण झालेली नाही तर त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट खोडसाळपणे एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे.
Result- Manipulated Media
Our Sources
महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-minister-aaditya-thackeray-tests-positive-for-covid-19/articleshow/81606259.cms
टिव्ही 9 भारतवर्ष- https://www.youtube.com/watch?v=B6tJb7NE0LE
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.