Fact Check
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात मृत? नाही, बनावट प्रेस रिलीज व्हायरल

Claim
सरकारच्या एका कथित प्रेस रिलीजनुसार, तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे न्यायालयीन कोठडीत निधन झाले.


पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल. आम्हाला आमच्या व्हॉट्सअप टिपलाइनवर (+91-9999499044) हा दावा पाठविण्यात आला असून सत्यता पडताळण्याची विनंती युजर्सनी केली आहे.

Fact
न्यूजचेकरच्या लक्षात आले की कथित प्रेस रिलीजवर तारीख नाही आणि त्यात “is actively” ऐवजी “isetively” आणि “reaffirm” साठी “realfirm” यासारख्या स्पष्ट चुका आढळल्या, ज्यामुळे ते बनावट असल्याचे दिसून येते.

त्यानंतर आम्ही “इम्रान खान मृत्यु” असा कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला ११ मे २०२५ रोजीचा हिंदुस्तान टाईम्सचा हा रिपोर्ट मिळाला, ज्यामध्ये असे म्हटले होते की पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूची घोषणा करणाऱ्या प्रेस रिलीजला “बनावट” म्हटले आहे आणि जनतेला “बेजबाबदार वर्तन नाकारण्याचे” आवाहन केले होते.
आम्हाला पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची १० मे २०२५ रोजीची X पोस्ट सापडली, ज्यामध्ये व्हायरल प्रेस रिलीजचे खंडन करीत ती बनावट असल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर न्यूजचेकरने खान यांच्या पक्षाच्या, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मीडिया विभागाशी संपर्क साधला, ज्यांनी हे पत्र बनावट असल्याची पुष्टी केली आणि म्हटले की, “श्री खान सुरक्षित आणि निरोगी आहेत आणि संबंधित न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची वाट पाहत आहेत.”
Sources
Hindustan Times report, May 11, 2025
X post, Pakistan’s ministry of information and broadcasting, May 11, 2025
Conversation with PTI media department
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल मधुसूदन यांनी केले असून येथे वाचता येईल.)