Authors
Claim
राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक संबोधले.
Fact
गांधींच्या भाजपबद्दलच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.
नवनिर्वाचित लोकसभेतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यात राहुल गांधी, “जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात, ते … 24 तास हिंसाचार, हिंसाचार, हिंसाचार, द्वेष, द्वेष, द्वेष…,” असे म्हणताना दिसतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युजर्सनी राहुल गांधींवर संपूर्ण हिंदू समाजाचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर लगेचच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी गांधींच्या भाषणातील भाग शेयर केले आणि आरोप केला की त्यांनी सर्व हिंदूंना हिंसा पसरवणारे लोक म्हणून संबोधले. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये वरिष्ठ सदस्य आणि कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक भाजप नेते होते.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि निर्मला सीतारामन हे अनेक सोशल मीडिया युजर्सपैकी आहेत ज्यांनी गांधींनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचा दावा केला होता. एका X पोस्टमध्ये नड्डा म्हणाले, “राहुल गांधीजींनी सर्व हिंदूंना हिंसक म्हणून संबोधल्याबद्दल त्यांची त्वरित माफी मागितली पाहिजे. हा तोच माणूस आहे जो परदेशातील मुत्सद्दींना हिंदू हे दहशतवादी असल्याचे सांगत होता. हिंदूंबद्दलचा हा आंतरिक द्वेष थांबला पाहिजे.”
अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.
Fact Check/ Verification
आम्ही संसद टीव्हीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर राहुल गांधींचे अलीकडील लोकसभेचे भाषण शोधले. 1 जुलै 2024 रोजी अपलोड केलेले ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव’ साठी त्यांचे संपूर्ण भाषण आम्ही पाहिले.
गेल्या 10 वर्षांपासून “संविधान, भारताच्या कल्पनेवर पद्धतशीर हल्ला…” असा आरोप करून गांधी आपले भाषण सुरू करतात. सुमारे 8 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये गांधी भगवान शिवाची प्रतिमा दर्शवितात आणि म्हणतात, “प्रत्येकाला ही प्रतिमा माहित आहे (भगवान शिवाच्या प्रतिमेचा संदर्भ देत)… या प्रतिमेमध्ये काही कल्पना आहेत ज्यांचा आम्ही स्वीकार करतो. विरोधक सुद्धा करतात. या प्रतिमेतील पहिली कल्पना ज्याचा आपण स्वीकार करतो ती म्हणजे आपल्या भीतीचा सामना करण्याची, कधीही न घाबरण्याची कल्पना. ती कल्पना या प्रतिमेत दर्शविली आहे, जी तुम्ही मला दाखवू देत नाही, भगवान शिवाच्या गळ्याजवळ बसलेल्या सापाद्वारे. त्यामागील मुख्य उद्देश आहे कि तुम्ही सामोरे जावे लागत असलेल्या कोणत्याही गोष्टीला घाबरू नका.”
“…त्रिशूल हे हिंसेचे प्रतीक नाही, ते अहिंसेचे प्रतीक आहे…जेव्हा आम्ही भाजपशी लढलो तेव्हा आम्ही हिंसक नव्हतो, तेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने होतो तेव्हा आमच्यात किंचितही हिंसा नव्हती…,” असे लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणतात.
“…आणि आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की केवळ एकच धर्म धैर्याबद्दल बोलत नाही. खरं तर, आपले सर्व धर्म धैर्याबद्दल बोलतात…,” इस्लाम, गुरु नानक, येशू ख्रिस्त यांच्या निर्भयतेच्या शिकवणुकीवर चर्चा करताना गांधी म्हणतात.
“भारताच्या इतिहासात तीन मूलभूत विचार आहेत…”हा देश अहिंसेचा देश आहे, हा भीतीचा देश नाही…,” ते पुढे म्हणाले.
त्यानंतर ते पुढील वाक्ये बोलताना ऐकू येते, “…सर्व संतांनी अहिंसेबद्दल सांगितले…भगवान शंकर म्हणतात घाबरू नका, इतरांना घाबरवू नका, ते अभय मुद्रा दाखवतात, शांततेबद्दल बोलतात, त्रिशूल जमिनीत गाडतात. आणि जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात, ते… चोवीस तास हिंसा, हिंसा, हिंसा, द्वेष, द्वेष, द्वेष… खोटे, खोटे, खोटे… तुम्ही हिंदू नाही.”
उल्लेखनीय म्हणजे, ही टीका करताना गांधी पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांच्या दिशेने बोट दाखवताना दिसतात, हे सूचित करते की त्यांची टिप्पणी सत्ताधारी पक्षासाठी होती.
गांधी पुढे म्हणतात, “हिंदू धर्मात हे स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्याने सत्याच्या बाजूने उभे रहावे, कोणीही सत्यापासून मागे हटू नये, सत्याला घाबरू नये. अहिंसा हे आमचे प्रतीक आहे.” त्यानंतर तो सत्ताधारी पक्षाच्या दिशेने अभय मुद्रा करून दाखवितात.
21:07 मिनिटांच्या सुमारास, PM मोदी हस्तक्षेप करतात आणि म्हणतात, “ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. संपूर्ण हिंदू समाजाला ‘हिंसक’ म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
पंतप्रधानांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना गांधी म्हणतात, “भाजपला, तुम्ही… नाही, नाही, नाही. नरेंद्र मोदी हा संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही.”
30:16 मिनिटांच्या दरम्यान, काँग्रेस नेते पुन्हा असे म्हणताना ऐकू येतात, “…तुम्ही भगवान शिवाकडे बघितल्यास, त्यांची प्रतिमा पाहून, हे समजू शकते की हिंदू भीती पसरवू शकत नाही, हिंदू हिंसाचार पसरवू शकत नाही, हिंदू द्वेष पसरवू शकत नाही. आणि भाजप, चोवीस तास, द्वेष, हिंसा, द्वेष, हिंसा, द्वेष, हिंसा…”
राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या लोकसभेतील भाषणातील अनेक भाग सभापतींच्या आदेशाने संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले. गांधी यांनी यासंदर्भात सभापती ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. तेच खाली पाहिले जाऊ शकते.
राहुल गांधींचा खालच्या सभागृहातील पूर्ण भाषणही त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे. ते खाली पाहिले जाऊ शकते.
राहुल गांधींचे खालच्या सभागृहातील पूर्ण भाषणही त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे. ते खाली पाहिले जाऊ शकते.
Conclusion
अशा प्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या टीकेचे खोटे वर्णन करून त्यांनी संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हटले आहे, असा खोटा दावा केला जात आहे.
Result: Missing Context
Sources
YouTube Video By Sansad TV, Dated July 1, 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा