मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही अनेक फेक दावे करण्यात आले. फ्राडिया गांधी कुटुंबाचे काळे सत्य म्हणजे इंदिरा खान बुरखा आणि हिजाबमध्ये आहेत, राहुलच्या डोक्यावर टोपी आहे, असा दावा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेत आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला अपात्र ठरल्या, असा दावा करण्यात आला. पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात सरस्वती पूजा साजरी करण्यास बंदी घालून तेथे इफ्तार पार्टी करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आयपीएस अधिकारी शैलजकांत मिश्रा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल बोलत आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

व्हायरल फोटोमध्ये इंदिरा गांधी हिजाबमध्ये आहेत?
फ्राडिया गांधी कुटुंबाचे काळे सत्य म्हणजे इंदिरा खान बुरखा आणि हिजाबमध्ये आहेत, राहुलच्या डोक्यावर टोपी आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

लाडकी बहीण योजनेत रायगड जिल्ह्यात 15000 महिला ठरल्या अपात्र?
लाडकी बहीण योजनेत आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15000 महिला अपात्र ठरल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठात सरस्वती पूजेवर बंदी घालून इफ्तार पार्टीचे आयोजन झाले?
पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात सरस्वती पूजा साजरी करण्यास बंदी घालून तेथे इफ्तार पार्टी करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

या व्हिडिओत आयपीएस अधिकारी शैलजाकांत मिश्रा नाहीत
आयपीएस अधिकारी शैलजकांत मिश्रा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल बोलत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.