मार्च महिन्याचा चौथा आठवडा नागपूर हिंसाचार आणि रमजानशी जोडलेल्या दाव्यांनी गाजला. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेश पोलिसांमार्फत पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली, असा दावा करण्यात आला. ती ‘कबर’ औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले, असा दावा करण्यात आला. नागपुरात अलिकडेच झालेल्या जातीय दंगलीनंतर नागपूरमध्ये भव्य भगवा रॅली काढण्यात आली, असा दावा करण्यात आला. अलिकडच्या जातीय दंगलींनंतर नागपूरमधील हिंदूंनी मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचा ठराव केला, असा दावा करण्यात आला. नागपूर हिंसाचाराच्या वेळी आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार पार्टी करत होते, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

ही यूपीमध्ये सपा राजवटीच्या काळातील इफ्तार पार्टी नाही
समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेश पोलिसांमार्फत पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

ती ‘कबर’ औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले?
ती ‘कबर’ औरंगजेबाच्या शौर्याचे प्रतीक असे संजय राऊत म्हणाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.

जातीय दंगलीनंतर नागपूरमध्ये भव्य भगवा रॅली झाली नाही
नागपुरात अलिकडेच झालेल्या जातीय दंगलीनंतर नागपूरमध्ये भव्य भगवा रॅली काढण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.

हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपुरातील हिंदूंनी मुस्लिमांवर ‘बहिष्कार’ घातला?
अलिकडच्या जातीय दंगलींनंतर नागपूरमधील हिंदूंनी मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचा ठराव केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

नागपूर हिंसाचाराच्या वेळी आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार पार्टी करत होते?
नागपूर हिंसाचाराच्या वेळी आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार पार्टी करत होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.