Thursday, April 17, 2025
मराठी

Fact Check

फॅक्ट चेक: यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा खोटा, स्क्रिप्टेड व्हिडिओ खरा मानून होतोय शेअर

Written By Komal Singh, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Aug 21, 2024
banner_image

Claim
व्हिडिओमध्ये दिसणारी हिंदू महिला 24 मुलांची आई आहे.
Fact
हा दावा खोटा आहे.

सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी हिंदू महिला 24 मुलांची आई आहे. व्हिडिओमध्ये महिला सांगते की 24 मुलांपैकी 16 मुले आणि 8 मुली आहेत, त्यापैकी सर्वात मोठा मुलगा 18 वर्षांचा आहे आणि सर्वात लहान मुलगा 1 वर्षाचा आहे.

12 ऑगस्ट 2024 रोजी X वर एका महिलेच्या मुलाखतीची सुमारे दीड मिनिटांची क्लिप पोस्ट (संग्रहण) करताना, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मुसलमान औरतें अगर 4 बच्चा पैदा कर ले तो टना टनी का करेजा में दर्द हो जाता है.! और इधर 24 बच्चों की हिंदू महिला से 16 लड़के और 8 लड़कियां है यूपी राज्य की यह महिला इधर डबल क्रिकेट टीम बना डाली इसके बारे मे टनाटन वाले कुछ कहना चाहेंगे..!”

फॅक्ट चेक: यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा खोटा, स्क्रिप्टेड व्हिडिओ खरा मानून होतोय शेअर
Courtesy: X/@99parinda

Fact Check/ Verification

दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम ‘हिंदू स्त्री, 24 मुलांची आई’ या कीवर्डसह Google वर शोधले. परिणामी, आम्हाला व्हायरल व्हिडिओ आणि इतर अनेक मुलाखती देखील मिळाल्या. यादरम्यान, महिलेने तिचे नाव खुशबू पाठक असल्याचे सांगितले आणि सांगितले की तिच्या 23 वर्षांच्या वैवाहिक जीवनात तिला 24 मुले झाली, त्यापैकी मोठ्या मुलाचे वय 18 वर्षे आहे. मुलाखतीत तिच्या मुलांची नावे विचारली असता, खुशबूने एक विचित्र उत्तर दिले की तिने आपल्या मुलांची नावे एक, दोन, तीन….सारख्या आकडेमोडीवर ठेवली आहेत.

मुलाखतीदरम्यान, खुशबूने तिच्या यूट्यूब चॅनल ‘apna aj’ चा अनेकदा उल्लेख केला आहे आणि ती एक कलाकार असल्याचे सांगते. 27 जुलै 2024 रोजी द पब्लिक खबरने शेअर केलेल्या खुशबू पाठकच्या व्हायरल मुलाखतीच्या कॅप्शनमध्ये, ‘लोक 24 मुलांच्या आईच्या सौंदर्याचे वेडे आहेत!’ पाहण्यासाठी लागतात रांगा. #trendingnews’ असे लिहिले आहे. या मुलाखतीचे वर्णन करताना चॅनलने म्हटले आहे की, ‘हा व्हिडिओ केवळ मनोरंजक आहे, ज्यामध्ये विनोदी टीमने काही विनोदी मुलाखती घेतल्या आहेत.’

फॅक्ट चेक: यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा खोटा, स्क्रिप्टेड व्हिडिओ खरा मानून होतोय शेअर

पुढील तपासात, आम्ही खुशबू पाठकने उल्लेख केलेल्या apna aj YouTube चॅनेलचा तपास केला. आम्हाला आढळले की चॅनेलवर अनेक स्क्रिप्ट केलेले व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये AJ ची सुमारे 8-10 लोकांची टीम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. यूट्यूब चॅनलने आपल्या बायोमध्ये लिहिले आहे की ते कॉमेडी व्हिडिओ बनवतात. तपासादरम्यान आमच्या लक्षात आले की, गेल्या काही दिवसांत या चॅनलवर खुशबू पाठक ‘२४ मुलांची आई’ सारख्या शीर्षकांसह अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.

फॅक्ट चेक: यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा खोटा, स्क्रिप्टेड व्हिडिओ खरा मानून होतोय शेअर

पुढील तपासात, आम्हाला 14 ऑगस्ट 2024 रोजी यूट्यूब चॅनल दिल्ली 24 वर शेअर केलेली आणखी एक मुलाखत सापडली. ‘हिंदू महिला २४ मुलांची आई आहे’ असा दावा व्हायरल झाल्यानंतर खुशबू पाठकने ही मुलाखत दिली होती. व्हिडिओमध्ये, तिने स्पष्ट केले की हे विनोदी व्हिडिओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले गेले आहेत आणि ‘मदर ऑफ 24 चिल्ड्रन’ हा फक्त तिच्या स्क्रिप्टचा भाग आहे. तिने सांगितले आहे की, व्हायरल मुलाखतीच्या शेवटी, हे सर्व कसे कॉमेडीचा भाग आहे हे उघड केले आणि त्याला प्रत्यक्षात दोन मुले आहेत. पण तो भाग मुलाखतीतून कापला गेला. मुलाखतीदरम्यान तिने तिचे वय 30 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले आहे.

आता आम्ही खुशबू पाठकची मुलाखत घेणाऱ्या यूट्यूब चॅनल PG News शी संपर्क साधला. फोनवरील संभाषणात त्यांनी हे व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवले असून त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. पुढे विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, वास्तवात apna aj यूट्यूब चॅनेलची कलाकार खुशबू पाठक यांना दोन मुले आहेत. आम्ही खुशबू पाठक यांच्याशीही संपर्क साधला आहे, प्रतिसाद मिळाल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात एका हिंदू महिलेला 24 अपत्य असल्याचा दावा असलेला व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला होता, हे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Sources
Youtube Channel apna aj.
Phonic Conversation with the team of youtube channel The Public Khabar.
Khushbu Pathak’s interview to youtube channel dilli 24.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,830

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.