Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत राम कमल दास यांची ४२ मुले आहेत, त्यापैकी अनेक मुले एकाच वर्षी जन्मली आहेत.
हा दावा दिशाभूल करणारा आहे. ही यादी २०२३ च्या वाराणसी महानगरपालिका निवडणुकीची आहे, ज्यामध्ये राम जानकी मठाचे महंत स्वामी राम कमल दास वेदांती यांचे नाव ४८ मतदारांचे वडील म्हणून नोंदवले गेले आहे. हे सर्व त्यांची मुले नाहीत तर त्यांचे शिष्य आहेत.
एक व्यक्ती ४२ मतदारांचा बाप असे सांगत निवडणूक मतदार यादीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणूक आयोगाच्या या यादीत राम कमल दास नावाची व्यक्ती ४२ जणांचे वडील असल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी अनेक मुले एकाच वर्षी जन्माला आली आणि सर्व ३७ वर्षांची आहेत. या मतदार यादीचा फोटो शेअर करून युजर्स निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR) जाहीर केल्यापासून, विरोधी पक्ष ‘मत चोरी’चा आरोप करून त्याचा विरोध करत आहेत. ७ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला, त्यानंतर या प्रकरणाला वेग आला. या संदर्भात, मतदार यादीचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
X आणि फेसबुकवरील दाव्यात मतदार यादीचा फोटो शेअर करीत लिहिले आहे की, “एकाच बापाची ४२ पोरं ,वय सगळ्यांचे २९ ते ६७ च्या आसपास आहेत. अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाल..
आमच्या भगिनीला एक वर्षात ३ बाळ झाली.” पोस्टच्या संग्रहित आवृत्ती येथे आणि येथे पाहता येतील. अशा इतर पोस्ट येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.


मतदार यादीच्या व्हायरल चित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी, न्यूजचेकरने सर्वप्रथम आम्ही संबंधित कीवर्ड्सद्वारे गुगल सर्च केले. या दरम्यान, आम्हाला मे २०२३ मध्ये प्रकाशित झालेले अनेक रिपोर्ट आढळले, ज्यात या व्हायरल मतदार यादीशी संबंधित माहिती होती.
४ मे २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या ईटीव्ही भारतच्या वृत्तानुसार, ही मतदार यादी २०२३ मध्ये वाराणसी महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रकाशित झाली होती आणि ती वाराणसी महानगरपालिकेच्या भेलुपूर येथील वॉर्ड क्रमांक ५१ ची आहे, जिथे राम कमल दास नावाच्या व्यक्तीची ४८ मतदारांचे वडिल म्हणून नोंदणी आहे. बातमीत, वाराणसीच्या खोजवा येथील राम जानकी मठाचे महंत स्वामी राम कमल दास वेदांती अशी त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे.
बातमीत, स्वामी राम कमल दास यांचे प्रतिनिधी रामभारत यांनी असे म्हटले आहे की स्वामीजी अविवाहित आहेत. परंतु, आश्रमात गुरु-शिष्य परंपरा पाळली जाते. यामुळे, या आश्रमात राहणारे सर्व विद्यार्थी स्वामीजींना त्यांचे गुरुपिता मानतात. या मतदार यादीत गुरूंचे नाव पित्याच्या नावाने नोंदवण्याचे हेच कारण आहे.
अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, उत्तराधिकार कायद्यानुसार, गुरु-शिष्य परंपरेत शिष्याचे स्थान देखील वडील आणि मुलासारखे मानले जाते. राम कमल दास वेदांती हे आश्रमाचे मतदार आहेत, त्यामुळे त्यांचे शिष्य देखील त्याच आधारावर मतदानाचा अधिकार वापरत आहेत.
या संदर्भात, आम्हाला अमर उजाला, एबीपी न्यूज, जागरण यासह अनेक माध्यमांकडून वृत्त मिळाले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की यादीत नोंदवलेली सर्व नावे वेदांती महाराजांच्या शिष्यांची आहेत. ही यादी त्यावेळीही व्हायरल झाली होती आणि तेव्हाही लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. समाजवादी पक्षाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याची दखल घेण्याचे आवाहनही केले होते. तथापि, मठाच्या व्यवस्थापकाने स्पष्टीकरण दिल्यानंतर हे प्रकरण स्पष्ट झाले.
यानंतर, आम्ही महंत स्वामी राम कमल दास वेदांती यांच्या मठात संपर्क साधला. मठ व्यवस्थापक रामभरत शास्त्री म्हणाले की, मतदार यादीत स्वामी राम कमल यांच्याशी जोडलेले मतदार त्यांची खरी मुले नाहीत. मठात शिक्षणासाठी आलेल्या मुलांची नावे मतदार यादीत नोंदली जातात. मठांच्या परंपरेनुसार, वडिलांच्या नावाऐवजी गुरुचे नाव लिहिले जाते. गुरु-शिष्य परंपरेत सामील झाल्यानंतर, शिष्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी गुरुचे नाव नोंदवले जाते.
रामभरत शास्त्री पुढे म्हणाले की, त्यागलेल्या शिष्यांची नावे यादीत नोंदवली जातात, जे आयुष्यभर मठात राहतात आणि गुरुला त्यांचे वडील मानतात. त्यांच्या गुणपत्रकांमध्ये आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांमध्येही गुरुचे नाव वडील म्हणून नोंदवले जाते.
त्यांनी असेही सांगितले की, पूर्वी अनेक शिष्यांची नावे यादीत जोडण्यात आली होती, परंतु आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
यानंतर, आम्ही उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर गेलो आणि २०२३ च्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रकाशित झालेल्या वाराणसी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५१- भेलुपूरच्या मतदार यादीची तपासणी केली. ही यादी तपासल्यावर आम्हाला आढळले की घर क्रमांक बी, २४/१९ अंतर्गत एकूण ५१ मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी ४८ मतदारांसमोर राम कमल दास यांचे नाव त्यांच्या वडिलांच्या जागी लिहिलेले आहे. यापैकी १३ मतदार ३७ वर्षांचे, पाच मतदार ३९ वर्षांचे, चार मतदार ४० वर्षांचे आहेत, तर उर्वरित ४२ वर्षांचे आहेत.

याशिवाय, आम्हाला उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO UP) यांची १२ मार्च २०२५ रोजीची एक पोस्ट सापडली, जी व्हायरल यादीबद्दल सविस्तर स्पष्टीकरण देते. त्यात म्हटले आहे की चित्रात दाखवलेली मतदार यादी ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची मतदार यादी भारतीय निवडणूक आयोग तयार करत नाही. निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करते.
सीईओ पुढे म्हणाले की, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की धार्मिक मठ/आश्रमाच्या बाबतीत, तेथे राहणाऱ्या व्यक्ती किंवा संन्यासींची ओळख त्यांच्या वडिलांऐवजी त्यांच्या गुरूच्या नावाने केली जाते. हे देखील शक्य आहे की आश्रमात राहणारे अनेक संन्यासी एकाच वयाचे असतील.

हे स्पष्ट आहे की २०२३ च्या वाराणसी महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदार यादी, ज्यामध्ये महंत स्वामी राम कमल दास यांचे नाव ४८ मतदारांचे वडील म्हणून नोंदवले गेले आहे, ती प्रत्यक्षात त्यांच्या शिष्यांची नावे आहेत. सध्या ही यादी दिशाभूल करीत व्हायरल केली जात आहे.
Sources
ETV Bharat report, May 4, 2023
Amar Ujala report, May 4, 2023
ABP News report, May 5, 2023
Jagran report, May 5, 2023
CEO, UP X-Post, March 12, 2025
Rahul Gandhi YouTube Video
Phonetic Conversation with Math Prabandhak Rambharat Shastri
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिन्दीसाठी सलमान यांनी केले असून येथे वाचता येईल)
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025