Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
फ्रीज अर्थात रेफ्रिजरेटर हा आजकाल प्रत्येक घरातील महत्वाची गोष्ट बनला आहे. अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या साठविण्यासाठी या फ्रीज चा वापर होतो मात्र, सध्या या फ्रीज बदल एक वेगळाच समज पसरविणारा दावा केला जात आहे. फ्रीज मध्ये साठविलेल्या वस्तू अतिशय घातक ठरू शकतात. फ्रीज मध्येच कँसर चे विषाणू तयार होतात. यामुळे कँसर होऊ शकतो आणि विशेषतः महिलांना याचा धोका जास्त असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे.
एक दोन वर्षांपासून व्हायरल होणारा दावा काही ठिकाणी छापूनही आला असून त्या छापलेल्या मजकुराची कात्रणेही व्हायरल केली जात आहेत.
आमच्या व्हाट्सअप टीपलाइन वर आमच्या वाचकांनी या दाव्याची सत्यता पडताळा अशी विनंती केली. सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातूनही हा दावा व्हायरल केला जात असल्याचेही आमच्या लक्षात आले. या दाव्याच्या शेवटी “साभार : डॉ. मकरंद करमरकर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई.” असा उल्लेख आम्हाला आढळला.
न्यूजचेकर ने दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी या दाव्यात फ्रीज मधील अन्नपदार्थ जास्त काळ ठेऊन वापरणे धोकादायक आहे. असे सांगणाऱ्या डॉ. मकरंद करमरकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तशी कोणतीही व्यक्ती आम्हाला सापडली नाही. अनेक प्रोफाइल शोधून पाहिल्या तरी अशा नावाच्या कोणत्याही व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचे आणि असा आपला दावा असल्याचे अधिकृतरीत्या सांगितल्याचे निदर्शनास आले नाही.
आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या वेबसाईटवर अशाप्रकारे एकादे संशोधन झाले आहे का? किंवा असा दावा करण्यात आला आहे का? याची माहिती तपासून पाहिली. मात्र आम्हाला तशी कोणतीच माहिती तेथे मिळाली नाही.
आम्ही महिलांना कँसर कशामुळे होतो याचा शोध घेतला. फ्रिज आणि त्यातील पदार्थांचा कँसर या रोगाशी तसेच महिलांशी काही संबंध आहे का? याचा शोध आम्ही घेतला. मात्र तसे कोणतेही संशोधन झाल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.
Onco.com वेबसाईटवर आम्हाला प्रकाशित करण्यात आलेला एक लेख आढळला. त्यामध्ये आम्हाला महिलांना होणाऱ्या कर्करोगांबद्दलची माहिती पाहायला मिळाली. मात्र फ्रीज मध्ये ठेवण्यात आलेल्या पदार्थांमुळे असा रोग होत असल्याची माहिती त्यात नाही.

अखेर आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला. तेथे आम्हाला या हॉस्पिटल मध्ये डॉ. मकरंद करमरकर या नावाची कोणतीही व्यक्ती कार्यरत नसल्याची माहिती देण्यात आली. या दाव्याशी इस्पितळाच्या कोणत्याही डॉक्टरांचा संबंध नाही. इस्पितळाने असे कोणतेही संशोधन केलेले नाही. शिवाय मकरंद करमरकर या व्यक्तीशी इस्पितळाचा संबंध नाही. अशी माहिती देण्यात आली. फ्रिज मधील वस्तू आणि कर्करोग याचा काही संबंध आहे की नाही हा संशोधनाचा विषय असून त्याबद्दल अभ्यास केलेला नसल्याने इस्पितळाने बोलणे टाळले. मात्र भविष्यात याबद्दल माहिती मिळाली की ती न्यूजचेकर ला कळविण्यात येईल असेही सांगण्यात आले.
न्यूजचेकरने केलेल्या तपासणीनुसार, फ्रीज मधील वस्तू आणि महिलांचा कँसर यासंदर्भात केलेला दावा चुकीच्या नावाचा वापर करून दिशाभूल करण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Telephonic conversation with PRO of Tata Memoriyal Hospital
Article published by Onco.com
Official website of Tata Memorial Hospital
तुम्हाला एकाद्या क्लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल, फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.
Prasad S Prabhu
September 24, 2025
Prasad S Prabhu
July 19, 2025
Prasad S Prabhu
July 16, 2025