Authors
दिवाळीच्या तोंडावर सोशल मीडियावर फेक पोस्टचे फटाके वाजतच राहिले. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फ्री रिचार्ज योजना सुरु केल्याचा दावा करण्यात आला. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता. असा दावा करण्यात आला. क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा फोटो शेयर करून त्यांच्यातील नाते उघड झाल्याचा दावा झाला. नरेंद्र मोदी गरबा नृत्य करीत आहेत, असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
काँग्रेसने सुरु केली फ्री रिचार्ज योजना?
२०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फ्री रिचार्ज योजना सुरु केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी बलात्कार केला होता?
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
सारा-शुभमन चा फोटो एडिटेड
क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा फोटो शेयर करून त्यांच्यातील नाते उघड झाल्याचा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
गरब्याच्या व्हिडिओत नरेंद्र मोदी नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी गरबा नृत्य करीत आहेत, असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा