Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkमहाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार नाही, खोटा दावा व्हायरल

महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजची चांगली बातमी महाराष्ट्र सीएम साहेबांना मनापासून धन्यवाद, मोठी बातमी महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाची फाईल उघडणार आहे. अमित शाह यांच्या अडचणीत वाढ.

संग्रहित

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=728790731050060&id=100017574198683

संग्रहित

Fact Check/Verification

महाराष्ट्र सरकार खरंच न्या. लोया प्रकरणाची फाईल पुन्हा खुली करणार आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र व्हायरल पोस्टमधील बातमी नजिकच्या काळात आढळून आली नाही. मात्र जानेवारी 9 जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध झालेली नवोदय टाइम्स या वेबसाईटवरील बातमी आढळून आली. ज्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी , जर कुणी ठोस पुरावे देत असेल तर न्या. लोया प्रकरणाची फाईल परत ओपन करण्यात येईल व तपास पुन्हा करता येईल असे म्हटले असल्याची माहिती दिली आहे.

यानंतर आम्ही या प्रकरणाच्या बाबतीत अधिक शोध घेतला असता आम्हाला 26 जानेवारी 2020 रोजी लाइव हिंदुस्तान या वेबसाईटवर बातमी आढळून आली. ज्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठोस पुरावे न मिळाल्याने न्या. लोया प्रकरणाचा तपास पुन्हा होणार नसल्याची माहिती दिल्याचे म्हटले आहे.

याशिवाय आम्हाला एएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विट देखील आढळून आले. ज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. लोया प्रकरणाचा तपास पुन्हा होणार नसल्याची माहिती दिली आहे.

दैनिक प्रभातने देखील महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा तपास पुन्हा करणार नसल्याचे वृत्त दिले आहे. यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की, अनेकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचे दावे केले मात्र कुणीही समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा होणार नाही.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, महाराष्ट्र सरकार न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास करणार नसल्याचे खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: False

Our Source

लाइव हिंदुस्तान- https://www.livehindustan.com/national/story-judge-loya-death-case-maharashtra-home-minister-anil-deshmukh-said-no-one-has-brought-any-concrete-evidence-2984873.html

दैनिक प्रभात- https://www.dainikprabhat.com/justice-no-re-examination-of-loya-case/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular