Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एका फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांसमोर दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले आहेत. शिवाय शेल्फमध्ये सोनिया गांधी यांचा फोटो देखील आहे दावा केला जात आहे की, हप्ता वसुलीतून मिळालेली रक्कम दोघे मोजत आहेत.
राज्यात सचिन वाझे प्रकरण चर्चेत आल्याने तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेला 100 कोटींचे वसुलेचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मात्र त्यांना कोर्टाने हायकोर्टात अपील करण्यास सांगितले. हायकोर्टाने तुम्ही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा का नोंदविला नाही असा प्रश्न सिंग यांना विचारला. दरम्यान आपल्या पक्षाचे गृहमंत्री असल्याने शरद पवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट करत त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.
अशातच शरद पवार आणि अनिल देशमुख यांचा पैसे मोजतानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो हिंदी पोस्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, Vasuli hafta gangs मुम्बई वसूली गैंग का असली सरगना… टेड़ा मुँह है… ये दोनों एक दिन पूरा महाराष्ट्र लूट कर खा जाएंगे l (मराठी अनुवाद- मुंबई वसुली गॅंगचा खरा सूत्रधार, वाकडं तोडं आहे… हे दोघे एक दिवस महाराष्ट्राला लूटून खातील.)


सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या या फोटोचे सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही Google Reverse Image चा आधार घेतला असता आम्हाला Hindustan Times ची 18 डिसेंबर 2016 रोजीची बातमी आढळून आली.
यात म्हटले आहे की, इंदूर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी नव्या चलनातील 2000 च्या 11.4 लाखांच्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणी चार जणांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका आरोपीच्या घरात प्रचंड रोख रक्कम असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली खब-यांकडून मिळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनारायण पुरोहित (48) आणि त्याचे दोन मुले विनोद पुरोहित (26) दिलीप पुरोहित (24) सर्व आरोपी मल्हारगंज पोलिस स्टेशन (पीएस) हद्दीतील 18 शाहिद हेमू कॉलनीतील रहिवासी आहेत.इंदौर मुख्यालयातील पोलिस अधीक्षक मोहम्मद युसुफ कुरेशी यांनी सांगितले, “पोलिसांनी नवीन चलनातील 11 लाख 40 हजार रुपये तर 3000 रुपयांच्या जुन्या नोटा पुरोहितच्या घरातून ताब्यात घेतल्या आहेत.प्राथमिक तपासणीदरम्यान पोलिसांना समजले की ते 18% टक्के कमिशनवर रोकड बदलणार आहेत. आयकर विभागाला त्यासंदर्भात कळविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे कुरेशी म्हणाले.
freepress journal ने देखील यासंदर्भात बातमी दिली होती. यात देखील म्हटले होते की, शहर गुन्हे शाखेने शनिवारी मल्हारगंज परिसरातील एका घरातून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 11.43 लाखाच्या 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.
आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटो आणि बातमीमधील फोटोची तुलना करुन पाहिली असता व्हायरल फोटो माॅर्फ केला असल्याचे स्पष्ट झाले. आपण दोन्ही फोटोंची तुलना खाली पाहू शकता.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, व्हायरल फोटो हा माॅर्फ करण्यात आला आहे.या मागे राष्ट्रवादी काॅंग्रेसला तसेच राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. हे काम आयटी सेलवाले करत आहेत.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शरद पवार आणि अनिल देशमुख यांचा माॅर्फ फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे. मुळात हा फोटो चार वर्षांपूर्वी इंदोर पोलिसांनी शहरात केलेल्या कारवाईचा आहे.
Hindustan Times – https://www.hindustantimes.com/indore/crime-branch-seizes-rs-11-4-lakh-in-new-currency-notes-arrests-4/story-DqVUOFgX9nBFTZQQiz5bdM.html
Free press Journal – https://www.freepressjournal.in/cmcm/4-arrested-with-new-notes-worth-rs-11-4-l
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
October 24, 2025
Sabloo Thomas
October 24, 2025
JP Tripathi
October 9, 2025