Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणात विनोदाने म्हटलेल्या मुद्द्याचा वापर करून दिशाभूल केली जात आहे.
चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते. असे सांगणारा एका दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. एका स्क्रीनशॉटचा वापर करून हा दावा केला जात आहे.
आम्हाला हा दावा यापूर्वीही सोशल मीडियावर झाला असल्याचे निदर्शनास आले.
व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी आम्ही व्हायरल स्क्रिनशॉट बारकाईने पाहिला. आम्हाला techveer01 इंस्टाग्राम अकाउंटने रील स्वरूपात हा दावा केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यावरून आम्ही इंस्टाग्रामवर शोध घेतला, मात्र संबंधित अकाउंटवर आम्हाला संबंधित रील मिळाली नाही.
संबंधित रील डिलीट करण्यात आले असल्याचा सुगावा घेऊन आम्ही इंटरनेट अर्काइव्ज शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला यश आले. नितीन गडकरींच्या भाषणाचा तुकडा वापरून हा दावा झाला असल्याचे आम्हाला या डिलीटेड रिलच्या संग्रहित आवृत्तीवरून निदर्शनास आले.
चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते का? हे पाहण्यासाठी आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून सर्च केला, मात्र आम्हाला यासंदर्भात सरकारने कोणता निर्णय घेतला असल्यासंदर्भात माहिती देणारे अधिकृत रिपोर्ट मिळाले नाहीत.
व्हायरल स्क्रिनशॉट आणि त्याच्या संग्रहित आवृत्तीत आम्हाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याबद्दल बोलताना आढळले. याबद्दल आम्ही काही किवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला असता, आम्हाला एक दीर्घ व्हिडीओ मिळाला. १६ जून २०२२ रोजी नितीन गडकरी यांनीच त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
“Inaugurating ‘Industrial Decarbonization Summit 2022’ (IDS-2022) | Nitin Gadkari” असे या व्हीडिओचे शीर्षक आहे. यामध्ये अर्थात इंडियन डिकार्बोनायझेशन समिट मध्ये बोलताना ३२ मिनिटे ५४ सेकंदानवर नितीन गडकरी पार्किंगच्या समस्येवर बोलताना विनोदी भावाने व्हायरल दाव्यातील भाग बोलताना दिसतात. संपूर्ण व्हिडिओचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केल्यावर, आम्हाला आढळले की चुकीचे पार्किंग हा एक महत्त्वपूर्ण धोका आहे असा संदर्भ मांडल्यानंतर गडकरींनी ही टिप्पणी थट्टेमध्ये केली आहे. तथापि, मंत्र्याच्या टिप्पणीला अद्याप कोणत्याही विधिमंडळ किंवा कायदेशीर चौकटीने समर्थन दिलेले नाही. सरकारने याबाबत कोणतेही नियम केलेले नाहीत.
या समिटमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण यावर बोलताना चुकीच्या पार्किंगबद्दल बोलताना नितीन गडकरी पुढे म्हणतात की, “मी एक कायदा आणणार आहे ज्या अंतर्गत चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र पाठवणाऱ्यास ५०० रुपये बक्षीस दिले जाईल, अर्थात ज्याचे छायाचित्र आहे त्याच्याकडून एक हजार रुपये दंड घेऊन.” हे वाक्य नितीन गडकरी यांनी विनोदाने पेरले असल्याचे आणि त्यानंतर हास्य आणि टाळ्यांनी त्याचे स्वागत झाल्याचे पाहायला मिळते.
नितीन गडकरी यांनी विनोदाने असे वक्तव्य केले असल्याचे सांगणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या असून त्या इथे, इथे आणि इथे वाचल्या जाऊ शकतात.
अशाप्रकारे आमच्या तपासात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विनोदाने बोललेल्या वाक्यांचा चुकीच्या अर्थाने संबंध जोडून हा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते हा दावा दिशाभूल करणारा असून सरकारने अद्याप असा निर्णय घेतलेला नाही.
Our Sources
Video published by Nitin Gadakari on June 16, 2022
Instagram account of techveer01
Self Analysis
News published by NDTV on June 17, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
March 11, 2025
Runjay Kumar
March 10, 2025
Prasad S Prabhu
March 8, 2025