Wednesday, April 24, 2024
Wednesday, April 24, 2024

HomeFact Checkगुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे...

गुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

( हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)

गुजरात विधानसभा निवडणुकीचा उत्साह वाढत असताना भाजप नेते हार्दिक पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तिकीट मिळाल्यानंतरच हार्दिक पटेलने रंग बदलला आणि आता भाजपवर टीका करत असल्याचा दावा केला जात आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
Courtesy:Twitter@ChobeyManisha
Courtesy:Facebook/ChachaBaklol

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या टप्प्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचवेळी, काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेल यांना पक्षाने विरमगाम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो दावा करत आहे की हार्दिक पटेलने तिकीट मिळाल्यानंतरच त्याचा रंग बदलला आहे.

Fact Check/Verification

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केले. तिकीट मिळाल्यानंतर हार्दिक पटेलने रंग बदलल्याचा उल्लेख करणारा कोणताही मीडिया रिपोर्ट आम्हाला सापडला नाही.

यानंतर आम्ही व्हायरल क्लिप काळजीपूर्वक पाहिली. आम्हाला समवाद समाचार चा लोगो पाहायला मिळाला. आम्ही त्याचे यूट्यूब चॅनल शोधू लागलो. 18 नोव्हेंबर 2022 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ येथे सापडला. त्यात व्हायरल क्लिपची लांबलचक आवृत्ती आढळून आली. तसेच 2 मिनिटे 6 सेकंदाचा हा व्हिडीओ हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात असतानाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यावरून हा व्हिडिओ किमान 5 महिने जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाचे हे आहे की, हार्दिक पटेल 2 जून 2022 रोजी भाजपमध्ये दाखल झाला आहे.

यानंतर, आम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स लागू करून ट्विटरवर शोध सुरू केला. आम्हाला India7_Official ने 4 मे 2019 रोजी केलेले ट्विट आढळले. व्हायरल व्हिडीओचा काही भाग त्यात उपस्थित असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काँग्रेसचा स्टार प्रचारक हार्दिक पटेलने उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधला.

तपासादरम्यान, आम्हाला 4 मे 2019 रोजी समवाद 365 नावाच्या YouTube चॅनेलने अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. त्यानुसार, लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर, हार्दिक पटेलने कौशांबी येथील कादीपूर मेला मैदानावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार गिरीश पासी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी काँग्रेसचा स्टार प्रचारक असलेल्या हार्दिकने आपल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. या यूट्यूब व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपचा एक भाग देखील आहे.

याशिवाय 4 मे 2019 रोजी ETV आणि राजस्थान पत्रिका मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांमधून हार्दिक पटेल याने कौशांबी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले असल्याची पुष्टी मिळते.

Conclusion

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की भाजप नेता हार्दिक पटेलचा तीन वर्ष जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ते भाजपवर काँग्रेसचे नेते असताना विरोधक म्हणून टीका करत आहेत. सध्या भाजपचे तिकीट मिळाल्यावर त्यांनी ही टीका केलेली नाही.

Result: False

Our Sources

Tweet by Indian7_Official


Youtube Video by Samvad 365

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular