Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केलेले नाही.
‘कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे.’ असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका X (पूर्वीचे ट्विटर) युजरने व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “कर्नाटक की कांग्रेस सरकार ने सभी स्कूलों में कुरान पढ़ाना अनिवार्य कर दिया है। बस के फ्री टिकट, और 200 यूनिट फ्री बिजली के चक्कर में हिन्दुओं ने बीजेपी सरकार के विरोध में मतदान किया था। अब भुगतो, इसलिए सनातनियों फोकट खाने से बचो, नहीं तो धीरे धीरे मिटा दिये जाओगे।”
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाळेतील प्रार्थना सभेत बकरीद सण साजरा होत असल्याचे दिसत आहे. आपण पाहतो की शाळकरी मुले हात जोडून बसलेली आहेत आणि मागून कुराणाच्या आयतींचा आवाज येत आहे. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थिनीने बकरीदचा अर्थ समजावून सांगितला आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी मुलांना संबोधित करून ‘बकरीदच्या शुभेच्छा’ दिल्या.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज सर्च करताना, 1 जुलै 2023 रोजी प्रकाशित झालेला एक रिपोर्ट मुन्सिफ डेलीच्या वेबसाइटवर आढळला. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील काही अंश रिपोर्टमध्ये इमेजच्या स्वरूपात पाहता येतील. हा रिपोर्ट वाचल्यानंतर कळले की हा व्हिडिओ कर्नाटकातील चन्नरायपटना येथील ज्ञानसागर इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा आहे. रिपोर्ट्सनुसार, शाळेत बकरीदचा सण साजरा करताना कुराणातील आयते वाचण्यात आली होती, त्याचाच व्हिडिओ आता वेगवेगळ्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.
आमच्या तपासणीत असे आढळून आले की या खाजगी शाळेत विद्यार्थ्यांनी बकरीदच्या उत्सवादरम्यान इस्लामिक वचने वाचल्याने/ऐकल्याने वाद निर्माण झाला होता. 1 जुलै 2023 रोजीचे अनेक मीडिया रिपोर्ट्स आहेत, ज्यात असे म्हटले आहे की एका हिंदू संघटनेशी संबंधित सुमारे सात-आठ स्थानिक लोक ज्ञानसागर इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये पोहोचले आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत शाळेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन खुलासा मागितला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजा फिलिप यांनी पोलिसांच्या उपस्थितीत याचा केलेला खुलासा एका व्हिडिओ रिपोर्टमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी येथे सांगितले आहे की, “आम्ही हे केवळ विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म रुजवण्यासाठी केले. आमचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. हे चुकीचे असेल तर भविष्यात असे होणार नाही याची काळजी घेऊ. आपण येथे सर्व सण साजरे करतो. आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की कोणत्याही मुलाला कुराण पठण करायला लावले नाही. केवळ तीन मुस्लिम विद्यार्थ्यांनी ते कथन केले. ही एक धर्मनिरपेक्ष शाळा आहे.”
पुढील तपास करताना, आम्ही कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये कुराण बंधनकारक करण्याचा आदेश जारी केला आहे का? याचा शोध घेतला. आम्ही कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील शोध घेतला, परंतु या दाव्याशी संबंधित काहीही आढळले नाही. याशिवाय शाळांमध्ये कुराण शिकवण्याबाबत कोणतेही प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले नाही. आम्हाला व्हायरल दाव्याची पुष्टी करणारा कोणताही मीडिया रिपोर्ट सापडला नाही. यावरून हा व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते.
आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. कर्नाटक सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केलेले नाही.
Our Sources
Report by News nine dated July 1, 2023
Statement by the school principal of Jnanasagara International Public School, Suja Philip in the video report by Daily Salar Digital, dated July 1, 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 7, 2025
Prasad S Prabhu
March 25, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025