Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
हवामान खात्याने २९ मे ते २ जुनसाठी केला हाय अलर्ट जारी.
हा दावा खोटा आहे. अशाप्रकारचा हाय अलर्ट कोणत्याही विभागाने जारी केला नाही.
उन्हाळ्याच्या तप्त झळा असह्य करीत असताना सध्या २९ मे ते २ जुनसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून हा मेसेज पसरविला जात आहे.
“हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, २९ मे ते २ जून दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणताही व्यक्ती बाहेर (मोकळ्या आकाशाखाली) जाणार नाही, कारण हवामान विभागाने तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जर कोणाला घुसमट जाणवली किंवा अचानक तब्येत बिघडली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरात राहताना दरवाजे खुले ठेवा जेणेकरून चांगला वायुवीजन (Ventilation) होईल. मोबाइलचा वापर कमी करा, कारण मोबाइल फटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कृपया सावध रहा आणि इतरांनाही ही माहिती द्या.” असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले असून काही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सर्वप्रथम आम्ही संबंधित किवर्डसच्या आधाराने आम्ही अशाप्रकारे कोणी हाय अलर्ट जारी केला आहे का? हे Google वर शोधले. मात्र आम्हाला अशी अधिकृत माहिती मिळाली नाही.
संबंधित अलर्ट ‘नागरिक सुरक्षा महासंचालनालय’ ने जारी केला आहे असे आम्हाला संबंधित मेसेजमध्ये वाचायला मिळाले. संबंधित खात्याचा इंग्रजीत अनुवाद ‘Directorate General of Civil Security’ असा होतो. दरम्यान आम्ही संबंधित इंग्रजी आणि मराठी नावांवरून संबंधित खाते किंवा महासंचालनालयाने कोणता अलर्ट जारी केला आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकृत काहीच सापडले नाही.
संबंधित व्हायरल मेसेजमध्ये हा मेसेज कोणत्या एका राज्यापुरता मर्यादित आहे का? याची माहिती आम्ही शोधली. मात्र तसा उल्लेख न आढळल्याने आम्ही केंद्रीय हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दल शोधले. मात्र माहिती उपलब्ध झाली नाही. असा हाय अलर्ट हवामान खात्याने दिला नसल्याचे दिसून आले.
जाणून घेण्यासाठी आम्ही भारतीय हवामान खात्यात काम करणाऱ्या अखिल श्रीवास्तव नावाच्या शास्त्रज्ञाशी फोनवर बोललो, त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल मेसेज खोटा आहे. आयएमडीने असा कोणताही हवामान अंदाज जारी केलेला नाही.
अधिक माहितीसाठी आम्ही नागरी संरक्षण विभागाशी संपर्क साधला जिथे आम्ही नागरी संरक्षण संप्रेषण विभागाच्या फायर सर्व्हिसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होम गार्डस विभागाच्या एडीजी कार्यालयाशी बोललो, जिथे आम्हाला सांगण्यात आले की नागरी संरक्षण विभागाने असा कोणताही संदेश जारी केलेला नाही.
अशाप्रकारे आमच्या तपासात अशाप्रकारचा हाय अलर्ट कोणत्याही विभागाने जारी केला नसल्याचे आणि हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Our sources
Google Search
Website of Indian Meteorological Department
Conversation with Mr. Akhil Shrivastav, Scientist, IMD
Conversation with ADG office of Civil Defense Communication Section
(Inputs by Raushan Thakur)
Runjay Kumar
June 5, 2025
Prasad S Prabhu
June 4, 2025
Komal Singh
June 4, 2025