नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या जातीय दंगलींनंतर मुस्लिम समुदायाच्या सदस्यांवर बहिष्कार टाकण्याचा “निर्णय” नागपूरमधील हिंदूंनी घेतला असे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपुरातील हिंदूंनी मुस्लिमांवर ‘बहिष्कार’ घातला असे हा दावा सांगतो.
व्हिडिओच्या सुरुवातीच्या काही फ्रेम्समध्ये, एक वृद्ध व्यक्ती मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना दिसत आहे आणि म्हणत आहे, “एक प्रतिज्ञा घ्या… जर तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली तर कोणीही तुम्हाला पाठिंबा देणार नाही, जर कोणी त्यांच्याशी व्यवसाय केला तर कोणीही तुम्हाला पाठिंबा देणार नाही… की मुस्लिम त्याचा मित्र आहे. कोणीतरी त्याच्याशी व्यवसाय करत आहे. जर हे असेच चालू राहिले तर तीच परिस्थिती निर्माण होईल…” जमाव त्या माणसाशी सहमत असल्याचे ऐकू येते.
व्हिडिओमधील मजकूर दावा करतो की, “नागपुर में हिंदुओं का निर्णय”. अनेक एक्स आणि फेसबुक युजर्सनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील अलीकडील हिंसाचाराशी जोडत शेअर केला. तथापि, न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.


अशा पोस्ट येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
Fact Check/ Verification
नागपूरमधील जातीय दंगलींशी जोडल्या जाणाऱ्या व्हायरल क्लिपचे आम्ही काळजीपूर्वक विश्लेषण करून सुरुवात केली. १:३४ मिनिटांच्या अंतरावर, आम्हाला एक व्यक्ती दिल्लीतील गाजीपूर येथील महापंचायतीचा उल्लेख करताना ऐकू आली. क्लिप सुरू झाल्यानंतर सुमारे २:३० मिनिटांनी, दुसरा माणूस म्हणतो की रोहित गुर्जरच्या खून प्रकरणात न्याय मिळवणे हा मुख्य हेतू आहे.
शिवाय, व्हिडिओची एक मोठी आवृत्ती १६ मार्च २०२४ रोजी संजीव भाटी (@sanjeev.bhati.9659) याच्या फेसबुक प्रोफाइलवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आली असल्याचे दिसून आले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये गाझीपूरमधील एका रहिवाशाच्या हत्येचा उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे १७ मार्च रोजी नागपूर हिंसाचार झाला.

रोहितची गाजीपूरच्या फुलांच्या बाजारात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. डीसीपी (पूर्व) अभिषेक धानिया यांनी सांगितले की, “हा वाद दोन गटांमधील पैशाच्या वादातून झाला आहे असून आरोपींनी गोळीबार केला. दोघांना अटक करण्यात आली आहे आणि उर्वरितांना अटक करण्यासाठी पथके काम करत आहेत.” अटक केलेल्या आरोपींची ओळख नाझिम आणि तालिब अशी झाली आहे.
मृताच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी १० मार्च रोजी दिल्ली-गाझियाबाद महामार्गावर निदर्शने केली. अनेक माध्यमांनीही असेच वृत्त दिले असून ते येथे, येथे आणि येथे पाहता येईल.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात नागपूरमधील हिंदूनी मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला असल्याचे दाखविणाऱ्या व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे आढळून आले.
Sources
Facebook Post By @sanjeev.bhati.9659, Dated March 16, 2024
Report By Indian Express, Dated March 11, 2025
Self Analysis