Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact Checkगृहमंत्रालय अधिकारी भासवत लुटारू येताहेत असा संदेश तुम्हाला आलाय का? तो फेक...

गृहमंत्रालय अधिकारी भासवत लुटारू येताहेत असा संदेश तुम्हाला आलाय का? तो फेक आहे काळजी करू नका

गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या वेशात लुटारू येत आहेत. त्यांच्याकडे लेटरहेड, शिक्के आणि इतर साहित्य असते. त्यांना घरी घेऊ नका. कारण घर लुटण्याचा आधुनिक मार्ग लुटारूंनी शोधून काढला आहे. असे सांगणारे आणि सावध करणारे संदेश सध्या जोरदार फिरू लागले आहेत. जनगणना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या नावाखाली हे लुटारू येत असून सावधान असा दावा केला जात आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हे संदेश व्हायरल झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Screengrab of viral message

“High Security Alert:
सावध रहा, घर लुटण्याचा अत्याधुनिक मार्ग म्हणजे असाच एक गट घरोघरी जाऊन गृहविभागाचा अधिकारी असल्याचे भासवत आहे. त्यांच्याकडे कागदपत्रे आणि गृह मंत्रालयाच्या विभागाचे लेटरहेड आहेत आणि प्रत्येकाकडे आगामी जनगणनेसाठी वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात. ते घरे लुटत आहेत. शासनाकडून असा कोणताही उपक्रम नाही याची नोंद घ्यावी. pls हे तुमच्या शेजारच्या ग्रुप चॅटवर पाठवा. ते सर्वत्र आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसतात. कृपया तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सतर्क करा. एक व्यक्ती घरी येते आणि म्हणते मला ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत तुमचा फोटो/थंबप्रिंट घ्यायचा आहे. त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक मशीन आणि तिच्या नावांची यादी आहे. ते यादी दाखवून ही सर्व माहिती विचारत आहेत. हे सर्व बोगस असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. कृपया त्याला कोणतीही माहिती देऊ नका. कृपया स्त्रियांना सांगा, खासकरून त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही कृपया त्यांना घरात येऊ देऊ नका.” असे तो संदेश सांगतो.

Screengrab of viral message

विवध राज्यात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संदेश संभ्रमात भर घालत आहेत.

Fact Check/ Verification

आम्ही या संदेशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी असे संदेश कुणी फेसबुक सारख्या माध्यमावर घातले आहेत का? याची पाहणी केली आणि आम्हाला आश्चर्यकारक माहिती मिळाली. अनेक युजर्सनी अनेक भाषांमध्ये असे मेसेज २०१७ आणि २०१८ सालीच केल्याचे स्क्रिनशॉट आम्हाला मिळाले. मूळ पोस्ट डिलिट करण्यात आल्या असल्या तरी हा सध्या मराठी भाषेत फिरणारा संदेश मूळ इंग्रजी भाषेत असल्याचे आम्हाला आढळून आले.

Courtesy: Facebook/ Sreeja Nair

आम्ही या संदर्भात गुगल वर आणखी सर्च केला. ‘गृहमंत्रालयाचा माणूस म्हणून घरी घुसणाऱ्या व्यक्ती ‘ असा सर्च केल्यावर बरीच माहिती मिळाली. सदर घटना ऑक्टोबर २०१७ मध्ये साऊथ आफ्रिका येथील केपटाऊन येथे घडली असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. अनेक वेबसाईट नी ही घटना केपटाऊन येथेच घडल्याचे नमूद केले आहे.

केपटाऊन येथे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर जनगणना आणि इतर कारणांवरून अनेक लुटारू घरोघरी जात होते. यासंदर्भात तेथील सरकारने दखल घेऊन अलर्ट जारी केला होता. काही समूह आणि व्यक्ती गृहमंत्रालयातील असल्याचे सांगून आणि दिखाव्यासाठी तशा कागदपत्रांचा आधार घेऊन लूट करू शकतात. दरम्यान अशा व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. असे आवाहन या अलर्ट च्या माध्यमातून करण्यात आले होते. याचाच आधार घेऊन आत्ता म्हणजेच २०१७ पासून आत्तापर्यंत विविध भाषांत पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली.

या घटना किंवा लुटीच्या संदर्भात आजवर भारतात एकही घटना घडल्याची नोंद झाली नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा निवडणूक आयोगानेही अशा प्रकारे कोणतीही माहिती जारी केलेली नाही.

न्यूजचेकरने मुंबईच्या सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला, ज्यांनी आम्हाला पुष्टी केली की असे कोणतेही प्रकरण अद्याप त्यांच्या निदर्शनास आले नाही. अशी प्रकरणे आढळल्यास नागरिकांना त्यांच्या हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधण्याचा सल्लाही विभागाने दिला आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल मेसेज चे साऊथ आफ्रिका कनेक्शन उघड झाले असून अशा घटनांचा किंवा अलर्ट चा भारताशी कोणताच संबंध नसल्याचे जाणवले आहे. सावधगिरी बाळगणे गरजेचे असले तरीही हे संदेश मूळ केपटाऊन मार्गे भारतात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Result: False

Our Sources

Article published by TOI on March 27,2019

Tweet made by @HomeAffairsSA


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular