Authors
Claim
नोकऱ्या जाण्याच्या भीतीने मुस्लिम समाजाने पळविलेल्या हिंदू जैन मुलीला स्वतः शोधून परत केले.
Fact
हा दावा खोटा आहे. नेल्लोर पोलिसांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे म्हटले आहे.
मुस्लिमासाठी जैन समाजाने उचललेले निर्णायक पाऊल किंवा प्रत्येक हिंदूभाईने उचलावे असे एक पाऊल असे सांगत एक मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा मेसेज सर्वत्र फॉरवर्ड होऊ लागला आहे.
आम्हाला या मेसेजची हिंदी आवृत्ती फेसबुकवर मिळाली.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
आम्हाला प्राप्त झालेला मराठी मेसेज पुढीलप्रमाणे आहे. “मुस्लिमासाठी जैन समाजाने उचललेले निर्णायक पाऊल…प्रत्येक हिंदूभाईने उचलावे असे एक पाऊल…दक्षिण भारतातील नेल्लोर भागात एका मुस्लिम तरुणाने जैन मुलीचे अपहरण केले. सकाळी आणि नंतर दुपारी जैन समाजाची बैठक झाली. बैठकीत अत्यंत गंभीर निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये 550 जैन दुकाने आणि जैन कारखान्यांतील मुस्लिमांना सांगण्यात आले की, सर्वांना आज आणि आता या नोकरीतून काढून टाकले जात आहे. सर्व मुस्लिमांना उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही, तुम्ही इतरत्र नोकरी शोधा, काही काळानंतर हिंदू समाजातील इतर सदस्यांनी एक एक करून जैन समाजाला पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत एकूण 1800 मुस्लिमांच्या नोकऱ्या गेल्या, तेव्हा मुस्लिम समाजवाला स्वतः नऊ तासांच्या आत जैन मुलीला शोधून काढले आणि तिला तिच्या घरी सोडून दिले. आणि आपल्या मुस्लीम समाजातील मुलांना त्या भागातील जैन आणि हिंदू मुलींकडे चुकूनही बघण्याचा प्रयत्न करू नका अशी धमकी दिली… मित्रांनो हीच एकतेची ताकद आहे… मित्रांनो सुद्धा अनेक थर्ड क्लास प्रकारचे, दयाळू, बुद्धीहीन, धर्मनिरपेक्ष, भ्याड, आणि फुकटचे सल्ले देणारे होते, भाऊ, या लोकांशी भांडू नका, कारण चूक फक्त एका मुस्लिमाची आहे, सर्व मुस्लिमांना गोळ्या घालू नका, सर्व इतर मुस्लिम निर्दोष आहेत.. बाकी….ती वेगळी गोष्ट आहे तिथल्या जैन समाजाने धर्मनिरपेक्षांचा एकही शब्द ऐकला नाही आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिला… अजून वेळ आहे…, तिथे जैन समाजाने एकता दाखवण्याचे उदाहरण दिले आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कृपया इतरांना शेअर करा.”
Fact Check/ Verification
हिंदू आणि जैन हे दोन भिन्न धर्म आहेत. त्यामुळे मेसेजमध्ये एका ‘हिंदू जैन’ मुलीचा असा उल्लेख दाव्याच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण करतो. हे आमच्या निदर्शनास आले.
आम्ही याविषयावर बराच शोध घेतला. किवर्ड सर्चच्या माध्यमातून शोध घेऊनही आम्हाला अशी घटना घडल्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही.
दरम्यान न्यूजचेकरने फेसबुक आणि ट्विटर वर नेल्लोर पोलिसांनी या घटनेवर कोणते भाष्य केले आहे का? किंवा यासंदर्भात कोणती कारवाई करण्यात आली आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला Nellore Police या फेसबुक अकाउंटवर २८ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली एक पोस्ट मिळाली.
या पोस्टमध्ये समाविष्ट कॅप्शनचे भाषांतर न्यूजचेकरने केले असता, “लोकांमध्ये वांशिक, धार्मिक आणि प्रादेशिक द्वेष पसरवण्यासाठी ग्रुपवर खोटे मेसेज पाठवणाऱ्या आणि सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री भास्कर भूषण, आयपीएस यांनी दिला आहे.” अशी माहिती आम्हाला मिळाली. या पोस्टमधील इंग्रजी भाषेतील प्रेसनोट आम्ही वाचून पाहिली.
“व्हायरल मेसेज पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. या मेसेज प्रमाणे कोणतीही घटना घडलेली नसून असे मेसेज पाठविणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो.अशाप्रकारचा मेसेज कोणीही पुढे पाठवू नये. असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” असे प्रेसनोट मध्ये आम्हाला वाचायला मिळाले.
दरम्यान अशाप्रकारची घटना घडल्याचे अधिकृतपणे सांगणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध नसल्याने काल्पनिक प्रसंग रंगवून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न २०१९ पासून सुरु असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा हा वास्तविक घटनेवर नव्हे तर काल्पनिक असल्याचे आणि नेल्लोर पोलिसांनीही त्याचे खंडन केले असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Facebook post Nellore Police on December 28, 2019
Press release by Nellore Police
Google Search Results
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in