Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असून त्यांचे अभिनंदन.
Fact
व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. गृहमंत्री अमित शहा किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही.
पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असून याबद्दल त्यांचे अभिनंदन असा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
या दाव्याचा तपास करताना आम्ही सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे का? याची माहिती घेतली. इंटरनेटवर याबाबत एकही बातमी आढळली नाही. इतका मोठा निर्णय घेण्यात आला असता तरी नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती. परंतु, असे काहीही दिसून आले नाही.
दरम्यान याचप्रकारच्या अनेक पोस्ट २०२२ पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. त्या इथे, इथे आणि इथे पाहिल्या जाऊ शकतात. दरम्यान हा दावा सध्याचा नसून यापूर्वीदेखील करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
इतका मोठा निर्णय असल्याने आम्ही अमित शहा यांच्या अधिकृत X अकाउंटवर त्याबद्दल काही घोषणा करण्यात आली आहे का? याची पाहणी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा या निर्णयाची घोषणा केली आहे का? हे आम्ही शोधले. मात्र याबद्दल काहीच आढळून आले नाही. अमित शहा यांच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील त्यांनी पाकिस्तानी झेंडा फडकावणाऱ्यांविरोधात असा काही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली नाही.
हा मेसेज जुना असल्याने आणि २०२२ पासून व्हायरल केला जात असल्याने आम्ही गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवरील प्रेस रिलीज या सदरात २०२२ पासून अशा निर्णयाबद्दलची घोषणा प्रेस रिलीजच्या माध्यमातून करण्यात आली आहे का? याचा शोध घेतला मात्र आम्हाला त्याबद्दल काहीच मिळाले नाही.
आणखी शोध घेताना आम्हाला १४ जून २०२२ रोजी दी इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेली एक बातमी वाचायला मिळाली.
“भारतात कोणताही विदेशी झेंडा फडकविण्यास बंदी असल्याची कोणतीच माहिती नाही.” असे केंद्राने स्पष्ट केलेले असल्याचे या बातमीत म्हटलेले आहे.
दरम्यान आम्ही यासंदर्भात माहितीसाठी PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाल्यावर हा लेख अपडेट केला जाईल.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. गृहमंत्री अमित शहा किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. हे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Official X account of Amit Shah
Official Website of Amit Shah
Official Website of Ministry of home affairs
News published by The Indian Express on June 14, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
May 25, 2024
Prasad S Prabhu
May 22, 2024
Prasad S Prabhu
May 1, 2024