Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
बहावलपूरमध्ये पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य केल्याचा व्हिडिओ.
हे दृश्य ARMA3 या लष्करी सिम्युलेशन व्हिडिओ गेममधील आहे.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानने बहावलपूरमध्ये भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हे दृश्ये लष्करी सिम्युलेशन व्हिडिओ गेम ARMA3 मधील आहेत आणि १ मार्च २०२२ रोजी YouTube वर अपलोड केलेल्या व्हिडिओमधून घेतलेली आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण नऊ ठिकाणी हल्ला केला. यामध्ये बहावलपूर, सियालकोट, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक आमरू यांचा समावेश आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ २१ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये एका लढाऊ विमानाला लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते. धडक बसल्यामुळे, लढाऊ विमान कोसळते आणि खाली पडते. हा व्हिडिओ X वर एका इंग्रजी कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यात आले.
बहावलपूरमध्ये भारतीय लढाऊ विमानाला लक्ष्य केल्याच्या व्हायरल दाव्यासोबत शेअर होत असलेल्या व्हिडिओची चौकशी करताना, की फ्रेम्स वापरून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती सापडली नाही. तथापि, असे अनेक व्हिडिओ आढळले, ज्यामध्ये ते ARMA 3 या व्हिडिओ गेममधील असल्याचे म्हटले गेले.
वर मिळालेल्या माहितीच्या आधारे, YouTube वर काही कीवर्ड शोधण्यात आले. या काळात आम्ही ARMA 3 व्हिडिओ गेमचे अनेक रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहिले. दरम्यान, आम्हाला १ मार्च २०२२ रोजी Compareed Comparison नावाच्या YouTube अकाउंटवरून अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला, ज्याचे शीर्षक आणि वर्णन ARMA 3 चा असल्याचे सांगत होते. जवळजवळ ४ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, आम्हाला व्हायरल झालेला भाग ३ मिनिटे ३० सेकंदांवर आढळला.
खालील चित्रात तुम्ही दोन्ही व्हिडिओंमधील साम्य पाहू शकता.
ARMA 3 हा बोहेमिया इंटरएक्टिव्ह नावाच्या कंपनीने विकसित केलेला एक लष्करी सिम्युलेशन व्हिडिओ गेम आहे. या व्हिडिओ गेममध्ये, आधुनिक शस्त्रे आणि युद्धभूमी डिजिटल पद्धतीने असतात, हा खेळ युजर्स त्यांच्या पद्धतीने खेळतात.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की बहावलपूरमध्ये भारतीय लढाऊ विमानाला लक्ष्य केल्याच्या दाव्यासह व्हायरल झालेला व्हिडिओ प्रत्यक्षात लष्करी सिम्युलेशन व्हिडिओ गेम ARMA 3 मधील दृश्ये आहेत.
Our Sources
Video Uploaded by Compared Comparison YT account on 1st March 2022
Vasudha Beri
June 19, 2025
Kushel Madhusoodan
June 18, 2025
Runjay Kumar
June 18, 2025