Authors
Claim
मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देत आहे.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या पारंपरिक शिल्पकार आणि कारागिरांना प्रतिदिन 500 रुपये देण्याची तरतूद आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेबाबत, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की मोदी सरकार सर्व लोकांना दररोज 500 रुपये देत आहे. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला असे आढळून आले की पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कारागीर आणि कारागिरांसाठी आहे आणि त्याअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना दररोज 500 रुपये दिले जातात.
1 मार्च 2024 रोजी शेअर केलेल्या 16 सेकंदांच्या YouTube शॉर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ क्लिप समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ”आपको हर रोज़ 500 रूपए भत्ता सरकार की ओर से दिया जायेगा।’ जिसके आगे वीडियो में एंकर द्वारा कहा जाता है कि ”जी हाँ, अब मोदी जी आपको दे रहे हैं 500 रूपए हर दिन.. अप्लाई करने के लिए फॉलो और कमेंट करें..।”
पंतप्रधान नरेंद्र मोदींची हीच व्हिडिओ क्लिप 29 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर केलेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये देखील वापरली गेली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ”आपको हर रोज़ 500 रूपए भत्ता सरकार की ओर से दिया जायेगा।” व्हिडिओमध्ये एक व्हॉईस ओव्हर जोडला गेला आहे, ”अब सरकार आपको देने जा रही है, 500 रूपए रोज़ाना..।” तसेच, व्हिडिओमध्ये पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा पुढे उल्लेख करण्यात आला आहे.
Fact Check/Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही Google वर व्हिडिओचे मुख्य फ्रेम्स शोधले. परिणामी, आम्हाला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत चॅनेलवर शेअर केलेला संपूर्ण व्हिडिओ सापडला. येथे पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेची घोषणा करत असल्याचे आपण पाहतो.
पुढे तपासात आम्ही कीवर्ड सर्चद्वारे पीएम विश्वकर्मा योजनेशी संबंधित माहिती शोधली. 17 सप्टेंबर 2023 रोजी एबीपी न्यूजने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचा 73 वा वाढदिवस आणि विश्वकर्मा जयंती रोजी विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना कर्ज आणि कौशल्य प्रशिक्षणाद्वारे त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी आणि चालवण्यास मदत केली जाते. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारख्या पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना लाभ मिळतो. ज्यावरून ही योजना केवळ शिल्पकार आणि कारागिरांसाठीच असल्याचे स्पष्ट होते.
पुढील तपासात आम्ही या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी माहिती शोधली. विविध बातम्या सांगतात की योजनेत सामील झाल्यानंतर, लाभार्थ्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये दिले जातात. तसेच, पहिले 1 लाख रुपयांचे कर्ज हमीशिवाय आणि परवडणाऱ्या व्याजदराने दिले जाते आणि या कर्जाची परतफेड केल्यानंतर, 2 लाख रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेता येते. पुढे तपासात आम्हाला असे आढळून आले की पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशिक्षणाच्या बदल्यात दररोज 500 रुपये भत्ता दिला जातो. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 500 रुपये भत्ता प्रशिक्षणादरम्यानच दिला जातो.
Conclusion
आमच्या तपासणीतून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये भत्ता दिला जातो.
Result: Missing Context
Sources
Official Youtube channel of Narendra Modi.
Report published by ABP News on 17th September 2023.
Report published by Jagran on 21st February 2024.
Report published by Times of India on 17th September 2024.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा