Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘मायक्रोवेव्ह उद्योग संपला !’ या शीर्षकाच्या लांबलचक लेखात दावा केला आहे की या निर्णयाला हिरोशिमा विद्यापीठाच्या एका अभ्यासाचे समर्थन करण्यात आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मायक्रोवेव्हमुळे अणुबॉम्बपेक्षा जास्त नुकसान होते. फेसबुक आणि ट्विटर सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हे मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहे. न्यूजचेकरने केलेल्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे.
फेसबुकवर हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
खरंच जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.यासाठी ‘End of the Microwave industry’ किवर्ड्सच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला अनेक पोस्ट आढळून आल्या ज्या 2019 पासून व्हायरल होत असल्याचे आढळले.
जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा करणारी पोस्ट 2019 आणि 2020 मध्ये ट्विटरवर देखील याच झाली आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या रिपोर्टनुसार, panorama.pub या रशियन विडंबनात्मक वेबसाइटने हा दावा 3 मार्च 2019 रोजी प्रकाशित केला आहे. आम्ही या वेबसाईटवरील शिर्षकाचा अनुवाद केला. यात म्हटले आहे की, “जपान 2020 पर्यंत मायक्रोवेव्ह ओव्हन बंद करेल.”
रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की “उगवत्या सूर्याच्या भूमीतील मायक्रोवेव्हवर बंदी घालण्याचे कारण म्हणजे हिरोशिमा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन, ज्यांना असे आढळून आले की मायक्रोवेव्ह ओव्हनचा 20 वर्षांहून अधिक काळ वापर केल्याने, किरणोत्सर्गी लहरीमुळे अधिक नुकसान होते. ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकन विमानांच्या अणुबॉम्ब हल्ल्यापेक्षा नागरिकांचे आरोग्य जास्त धोक्यात आहे.
लेखाची वैशिष्ट्ये देणारे वेबपृष्ठ एक अस्वीकरण आहे आहे “या साइटवरील माहिती लेख विडंबनात्मक आहेत, वास्तविक बातम्या नाहीत”. यावरुन स्पष्ट होते की जापनमधील मायक्रोव्हेव बाबातचा दावा खोटा आहे.
शिवाय, जागतिक आरोग्य संघटनेने दाव्याच्या किरणोत्सर्गाच्या पैलूवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “काही गैरसमज दूर करण्यासाठी, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये शिजवलेले अन्न “रेडिओएक्टिव्ह” होत नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तसेच मायक्रोवेव्ह ओव्हन बंद केल्यानंतर पोकळी किंवा अन्नामध्ये कोणतीही मायक्रोवेव्ह ऊर्जा शिल्लक राहत नाही. या संदर्भात, मायक्रोवेव्ह प्रकाशाप्रमाणेच कार्य करतात; जेव्हा लाइट बल्ब बंद केला जातो तेव्हा कोणताही प्रकाश शिल्लक राहत नाही.
हे देखील वाचा : केळीतून अळ्या बाहेर काढल्याचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? जाणून घ्या सत्य
जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे. एका विडंबनात्मक वेबसाईटने प्रकाशित केलेला गमतीशीर लेख खरे मानून शेअर केला जात आहे.
False claim
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
March 11, 2025
Prasad S Prabhu
January 31, 2025
Prasad S Prabhu
December 18, 2024