Authors
Claim
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली आहे.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल झालेली बातमी 2013 सालची आहे.
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली. असा दावा सध्या केला जात आहे. तेलंगणा वक्फ बोर्डाने हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल मॅरियटला आपली मालमत्ता असल्याचा दावा करीत याचिका दाखल केली होती. जो नुकताच तेलंगणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस सत्तेत आल्यास वक्फ समोर ठेवून इतर समाजाच्या मालमत्ता लोकांमध्ये वाटून टाकतील, असा आरोप करत आहेत.
दरम्यान, इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राची एक क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की बेंगळुरूमधील Sevenstar ITC विंडसर हॉटेलला कर्नाटकातील वक्फ बोर्डाने रिकामे करण्याची नोटीस दिली आहे. कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे, हे विशेष. येथे एक्स-पोस्टचे संग्रहण पाहता येईल.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मराठी भाषेतून शेयर केला जात असल्याचे निदर्शनास आले.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. इकॉनॉमिक टाईम्सची ही बातमी 2013 सालची आहे. कर्नाटक वक्फ बोर्ड आणि आयटीसी विंडसर हॉटेल यांच्यातील न्यायालयीन प्रकरणात अलीकडे असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
Fact Check/ Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, प्रथम आम्ही व्हायरल दाव्यासह शेयर केलेल्या फोटोवर रिव्हर्स इमेज शोध केला. आम्हाला आढळले की ही 8 ऑगस्ट 2013 रोजी इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केलेल्या बातमीची ही क्लिपिंग आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की “बंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल वक्फ बोर्डाने महिन्याच्या अखेरीस रिकामे करण्यास सांगितले होते. नोटीसनुसार ही मालमत्ता आगा अली असगर वक्फ इस्टेटची आहे. दोन्ही पक्षांमधील मुख्य वाद हा भाड्याचा होता, जो पूर्वी प्रति चौरस फूट 5,500 रुपये होता. मात्र, नंतर ते 1,65,000 रुपये प्रति चौरस फूट करण्यात आले. इस्लाममध्ये हराम असलेले डुकराचे मांस आणि अल्कोहोल हॉटेलमध्ये दिल्यानेही बोर्ड नाराज होते. वक्फ बोर्डाने 2003 मध्ये लीज संपल्यानंतर जागा रिकामी होईपर्यंत ITC कडे थकबाकीची मागणी केली होती.”
पुढे तपासात आम्ही आयटीसी विंडसर हॉटेलची वेबसाइट शोधली. दरम्यान, आम्हाला आढळले की ITC विंडसर हॉटेल, बेंगळुरू अजूनही बुकिंग सेवा देत आहे. आता आम्ही कर्नाटक वक्फ बोर्डाने नुकतीच हॉटेल रिकामे करण्याची सूचना केव्हा दिली याबद्दल माहिती शोधली. मात्र यादरम्यान आम्हाला याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी मिळाली नाही.
अधिक तपासात आम्ही हॉटेलच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगितले की, “हे जुने प्रकरण आहे आणि व्हायरल होत असलेली बातमी 2013 मधील आहे. ते पुढे म्हणाले की सध्या या प्रकरणावर असे कोणतेही अद्यतन नाही आणि अलीकडेच कर्नाटक वक्फ बोर्डाकडून हॉटेल रिकामे करण्याची कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही.” हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
तपासात पुढे जात आम्ही कर्नाटक वक्फ बोर्डाचे सदस्य के. अन्वर बाशा यांच्याशीही या प्रकरणी बोललो. फोनवरील संभाषणात, त्यांनी स्पष्ट केले की, “व्हायरल बातम्या 2013 मधील आहेत, परंतु अलीकडे कर्नाटक वक्फ बोर्डाने ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची कोणतीही नोटीस दिलेली नाही.” त्यांनी सांगितले की, “हे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे ज्यावर निर्णय येणे बाकी आहे.”
Conclusion
आमच्या तपासणीत, आम्हाला आढळले की कर्नाटक वक्फ बोर्डाने अलीकडे ITC विंडसर हॉटेल, बेंगळुरूला जागा रिकामी करण्याची कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
Result: Missing Context
Sources
Report published by Economic times on 13th August 2013.
Phonic conversation with PR manager of ITC Windsor, Bengaluru.
Phonic conversation with Waqf Board Member K. Anwar Basha.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in