Monday, May 13, 2024
Monday, May 13, 2024

HomeFact CheckFact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा...

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य

Claim
एक संदेश फॉरवर्ड केल्यास तसेच त्यावरील क्रमांकांवर संपर्क साधल्यास गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलेल आणि लाडली फौंडेशन तर्फे गरीबाच्या मुलीला लग्नासाठी मदत मिळेल.
Fact
हा दावा खोटा आहे. मेसेजमधील मोबाईल क्रमांक बंद असून मेसेजला कोणताच आधार नाही. लाडली फौंडेशनने ही याचा इन्कार केला आहे.

शाळांच्या परीक्षा संपल्या, निकाल लागताहेत आणि सुट्ट्या पडत असतानाच नव्या शिक्षणाचे वेध विद्यार्थी आणि पालकांना लागत आहेत. याचवेळी एक संदेश मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल होणार दावा गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळण्याची आशा निर्माण करीत आहे. याचबरोबरीने लग्नसराईच्या निमित्ताने गोर गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत मिळण्याची स्वप्ने दाखवीत आहे. या मेसेज च्या माध्यमातून होणार दावा मोठ्याप्रमाणात लोक फॉरवर्ड करीत असल्याचे आम्हाला दिसून आले.

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य
Courtesy: Facebook/ Sunil P Kurhade

“ज्या विद्यार्थ्यांना शाळेची पुस्तके पाहीजेत, शाळेची फि भरु शकत नाहीत, त्यांनी खाली दिलेल्या 24 मोबाईल पैकी कुठल्याही नंबरवर संपर्क करा. 1) 9460031554, 2) 9001236414, 3) 9549677770, 4) 9314459474, 5) 9828926151, 6) 9328620003, 7) 9826267649, 8) 9888989746, 9) 9653150004, 10) 8889712233, 11) 9926311234, 12) 8889995733, 13) 8889995731, 14) 9826813756, 15) 9752033255, 16) 9826858785, 17) 7489587851, 18) 9175475384, 19) 9098321420, 20) 9879537809, 21) 9825700070, 22)9727215130, 23) 9879200245, 24) 9328229214 या मेसेजला एवढे फाॅरवर्ड करा की, तुमच्यामुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्याचे आयुष्य बदलू शकते. आवश्य वाचा आणि फाॅरवर्ड करा,” हा व्हायरल मेसेजचा एक भाग आहे.

दुसऱ्या भागात ” जो आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहे, त्यांनी आपल्या मर्जीने आपल्या मुली साठी योग्य स्थळ (जावई) पसंत करुन खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. लग्नाचा पूर्ण खर्च लाडली फाउंडेशन मार्फत केला जाईल व प्रत्येक लाडक्या मुलीला नवे जीवन सुरू करण्यासाठी संस्थेकडून १ लाख रूपये किमतीचे घरगुती सामान भेट स्वरूपात दिले जाईल. लाडली फाउंडेशन ९८७१७२७४१५, ९८७३१८२४६८, ९७१७२३१६६३ आपल्या सर्वांना विनंती आहे की, विनोदी चुटकुले पाठवण्यापेक्षा ह्या मेसेजला पाठवा जेणेकरून लोकांना माहिती होईल.🙏 🙏 श्री. नाना पाटेकर टिप – शेर करा कोणी तरी याचा उपयोग नक्की करेल. माणूस म्हणून जगण्यापेक्षा एक चांगला व्यक्ति म्हणून जगा.” असा मजकूर वाचायला मिळतो.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य

Fact check/ Verification

व्हायरल मेसेजची सत्यता तपासण्याचा प्रयत्न आम्ही केला.

व्हायरल मेसेजच्या पहिल्या भागात शाळेची फी भरू न शकणाऱ्या विध्यार्थ्यांना फी आणि शाळेच्या पुस्तकांसाठी मदत मिळवून देण्यासाठी २४ मोबाइल क्रमांक देण्यात आल्याचे आमच्या पाहणीत आले. व्हायरल मेसेज मध्ये ही मदत कोणती संस्था देणार आहे याचा उल्लेख आढळला नाही. यामुळे आम्ही चौकशी साठी सदर मोबाईल क्रमांक लावण्यास सुरुवात केली. मात्र २४ पैकी एक ही मोबाईल क्रमांक सुरु नसल्याचे आमच्या लक्षात आले. अज्ञात व्यक्तींचे मोबाईल क्रमांक वापरून मेसेज बनविण्यात आला असावा, अर्थात वारंवार मदत मागण्यासाठी फोन आल्याने संबंधित व्यक्तींनी आपले मोबाईल क्रमांक बंद केले असावेत. अशी शक्यता आम्हाला वाटली.

तरीही मेसेज मराठीत असल्याने शालेय फी आणि शाळेच्या पुस्तकांसाठी कोणती संस्था अशी मदत देते किंवा हेल्प लाईन चालविते का याचा शोध आम्ही घेतला असता, आम्हाला अशा कोणत्याही संस्थेची माहिती मिळाली नाही. सरकारी योजनेतून मोफत पुस्तके मिळतात. सरकारी शाळेत मोफत शिक्षणाची सोय आहे. खासगी शाळेत मोफत शिक्षणाची सोय मिळविण्यासाठी आर टी ई सुविधा आहे. मात्र राज्य पातळीवर आम्हाला अशी कोणतीही खासगी संस्था आढळली नाही. यावरून आम्हाला हा मेसेज चुकीचे क्रमांक वापरून दिशाभूल करण्याचे एक माध्यम असल्याचेच निदर्शनास आले आहे.

लाडली फौंडेशन देते खासगी लग्नांना मदत?

व्हायरल मेसेज मध्ये “जो आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहे, लग्नाचा पूर्ण खर्च लाडली फाउंडेशन मार्फत केला जाईल व प्रत्येक लाडक्या मुलीला नवे जीवन सुरू करण्यासाठी संस्थेकडून १ लाख रूपये किमतीचे घरगुती सामान भेट स्वरूपात दिले जाईल,” असा उल्लेख आढळला. दरम्यान यासंदर्भात न्यूजचेकरने यापूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी केलेल्या फॅक्टचेक “लाडली फाउंडेशन खाजगी वैयक्तिक विवाहांना आर्थिक सहाय्य देत नाही” नुसार हा मजकूरही पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आपण ते फॅक्टचेक इथे वाचू शकता.

सदर फॅक्टचेक नुसार, लाडली फौंडेशन ने व्हायरल होणाऱ्या बनावट मेसेजवर विश्वास ठेऊ नका. असे सांगणारे एक जाहीर प्रकटन ३ डिसेंबर २०१५ रोजी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्धीस दिले आहे. ते आपल्या माहितीसाठी खाली देत आहोत.

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य
Courtesy: Facebook/Ladli Foundation

लाडली फौंडेशन चे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता यांनी केलेले ते जाहीर प्रकटन असून त्यात त्यांनी वैयक्तिक लग्नांना मदत देण्याच्या संदेशाचा इन्कार केला आहे. “मी लाडली फाऊंडेशनशी संबंधित संदेशाबद्दल सर्वांना कळवू इच्छितो की आमचा संदेश एका व्हॉट्सअप ग्रुपने चुकीच्या पद्धतीने संपादित केला आहे आणि देशभरातून लाखो लोकांना पाठविला गेला आहे, ज्यामुळे आम्हाला देशभरातून मोठ्या संख्येने कॉल येत आहेत. सर्व कॉल्सना उत्तर देणे शक्य नाही. म्हणूनच ते नंबर बंद केले आहेत. आणि देशभरातून हजारो लोक फोन करून नाराज होत आहेत. मला तुम्हाला सांगायचे आहे की २९ नोव्हेंबर २०१५ रोजी दिल्लीतील छत्तरपूर मंदिराच्या मैदानावर लाडली फाउंडेशनच्या वतीने ५१ दिव्यांग मुलींचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला. ज्यात हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्व धर्मातील गरीब मुलींचे विवाह मोठ्या धूमधडाक्यात केले. ज्यामध्ये प्रत्येक मुलीला जवळपास सर्व घरगुती वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. लाडली फाउंडेशन त्यांच्या सामूहिक विवाह कार्यक्रमात गरीब मुलींना फक्त घरगुती वस्तू आणि इतर मदत पुरवते आणि इतर कोणतीही मदत करत नाही. संस्थेच्या पुढील कार्यक्रमाची माहिती संस्थेच्या फेसबुकवर टाकण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे की लाडली संस्थेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आपण संस्थेच्या फेसबुक पेजवर सहभागी होऊ शकता.” असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही पुन्हा एकदा लाडली फौंडेशन चे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, ” या दिशाभूल करणाऱ्या मेसेजमुळे आम्ही त्रासाला आहोत असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून यासंदर्भात केलेल्या दोन ट्विट संदर्भात माहिती दिली असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा असे आवाहन केले. यापैकी एक ट्विट १९ मार्च २०२३ रोजी करण्यात आले आहे.

“लाडली फौंडेशन तर्फे आपल्याला मदत मंजूर झाली आहे असे खोटे पत्र पाठवून नोंदणीच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत आहे. कृपया सावध राहा आणि सावध करा.” अशी सूचना करण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी पैसे दिले जातात असे सांगणाऱ्या मेसेज संदर्भात फौंडेशन ने ११ एप्रिल २०१४ रोजी पुन्हा ट्विट केले असून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या मेसेज च्या शेवटी नाना पाटेकर यांचे नाव आढळले. अभिनेते नाना पाटेकर विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असतात. यामुळे त्यांचा नेमका काय संबंध लाडली फौंडेशन च्या कामाशी आहे का? याचा शोध आम्ही घेतला. त्यावेळी नाना पाटेकर यांचा लाडली शी कोणताही थेट संबंध असल्याचे दिसून आले नाही. दरम्यान नाना पाटेकर यांची महाराष्ट्रात नाम फौंडेशन नावाची सामाजिक सेवा संस्था असल्याचे आणि त्या माध्यमातून दुष्काळ पीडितांना त्यांनी मदत केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. महाराष्ट्र टाइम्स ने ६ मे २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत नाना पाटेकर याने गरीब मुलींच्या लग्नासाठी १७ लाखांची मदत वैयक्तिक स्वरूपात केल्याची माहिती आम्हाला मिळाली, मात्र याचा लाडली फौंडेशन शी संबंध असल्याचे आम्हाला दिसले नाही.

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य
Screengrab Maharashtratimes.com

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात गरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि लाडली फौंडेशन च्या नावे मुलींच्या लग्नासाठी मदत देण्याच्या नावाखाली पसरविला जात असलेला मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाडली फौंडेशन शी अभिनेते नाना पाटेकर यांचा काहीच संबंध नाही. त्यांनी संस्थेच्या नावे कोणतेही आवाहन केले नाही आणि हे फौंडेशन वैयक्तिक खासगी स्वरूपातील लग्नांना कोणतीही मदत करीत नाही. हे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources

Post Published by Ladli Foundation on December 3, 2015

Tweet made by Ladli Foundation on March 19, 2023

Tweet made by Ladali FOundation on April 11, 2023

News published by Maharashtra Times on May 6, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular