Authors
हा आठवडाही सोशल मीडियावरील बनावट पोस्टमुळे गाजला. आरएसएस ने मुस्लिम तरुणींना फशी पाडण्याचे आवाहन केले असे सांगणारा एक दावा करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी गरिबांना फक्त स्वप्ने दाखवून राज्य करा असे म्हटल्याचे सांगत एक पोस्ट व्हायरल झाली. अंबानींनी एका कार्यक्रमात टिश्यू पेपर ऐवजी पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्याचा दावा करण्यात आला. काही मोबाईल क्रमांकांवर फोन केल्यास गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळेल आणि लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी पैसे देईल असे सांगणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.
आरएसएस ने असे पत्र जारी केले नाही
मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी हिंदू तरुणांनी लग्न करावे, ५ लाख रुपये देऊ, असे आवाहन आरएसएस ने पत्राद्वारे हिंदू तरुणांना केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
मोदींनी असे विधान केले नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गरिबांना फक्त स्वप्ने दाखवा, खोटे बोला, आपापसात लढवा आणि राज्य करा.” असा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. आम्ही केलेल्या तपासात हा दावा संदर्भ वगळून दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास आले.
अंबानींनी वाटले कार्यक्रमात पैसे?
अंबानी कुटुंबाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात टिश्यू पेपरऐवजी ₹500 च्या नोटा दिल्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे.
मदतीचे गाजर दाखविणारा हा मेसेज खोटा
एक संदेश फॉरवर्ड केल्यास गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलेल आणि गरीबाच्या मुलीला लग्नासाठी मदत मिळेल असे सांगत एक मेसेज व्हायरल झाला. आम्ही केलेल्या तपासात हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in