Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
भारतीय डाक विभागाने या दाव्याचे खंडन केले असून टपाल पेट्या सुरु राहणार आहेत.
भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय, असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
X आणि फेसबुकवर अनेक युजर्स असा दावा करीत आहेत.


दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमची व्हाट्सअप टिपलाइन (91-9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

“अखेरचा हा तुला दंडवत !! भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे…_१८५४ पासून सुरू झालेला प्रवास सप्टेंबर २०२५ रोजी कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे!!” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.
भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे का? हे शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम Google वर सर्च केला. मात्र आम्हाला यापद्धतीची माहिती देणारी एकही बातमी मिळाली नाही.
आम्हाला The Hindu ने २१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित केलेली एक बातमी सापडली.

या बातमीत “भारतीय टपाल विभाग लाल लेटरबॉक्स टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याच्या सुरू असलेल्या अटकळीवर पडदा टाकताना, तेलंगणा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल पी.व्ही.एस. रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले की, टपाल पेट्या बंद होणार नसून त्यांचे स्वरूप अधिक विकसित होणार आहे. टपाल पेट्यांचे यापुढे डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे.” अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
दरम्यान आम्ही भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर टपाल पेट्या बंद करण्यासंदर्भात काही निर्णय जाहीर करण्यात आला आहे का? याचा शोध घेतला. दरम्यान विभागाच्या @IndiaPostOffice या अधिकृत X खात्यावरून ७ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या पोस्टमध्ये व्हायरल दाव्याचे खंडन करण्यात आलेले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
भारतीय डाक विभागाने टपाल पेटीचा फोटो वापरत केलेल्या या पोस्टमध्ये “मी अजूनही इथेच आहे आणि नेहमीच असेन!” इंडिया पोस्ट काळानुसार विकसित होत आहे, परंतु काही गोष्टी नेहमीच तशाच राहतील. आम्ही पिढ्यानपिढ्या प्रेम, बातम्या आणि कथा घेऊन आलो आहोत… आणि काय सांगू? आमचे लाल लेटरबॉक्स येथेच राहतील. ते संबंध, आठवणी आणि महत्त्वाच्या क्षणांचे प्रतीक आहेत. तेव्हा. आता. नेहमीच. हस्तलिखित पत्रे पाठवत रहा – आम्ही तुमच्यासाठी येथे आहोत.” (मराठी भाषांतर) असे म्हटले आहे.
दरम्यान आम्हाला “भारतीय पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा 1 सप्टेंबरपासून बंद, 50 वर्षे जुनी पोस्टल सुविधा आता इतिहास जमा” या शीर्षकाची इकॉनॉमिक्स टाइम्स ची ६ ऑगस्ट २०२५ ची बातमी मिळाली.

“भारतीय टपाल खात्याने १ सप्टेंबर २०२५ पासून त्यांची रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग आहे. याचा उद्देश काम अधिक जलद चालवणे आहे. आता रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन केले जाईल, ज्यामुळे ही ५० वर्षांहून अधिक जुनी सेवा इतिहास जमा होईल.” असे या बातमीत आम्हाला वाचायला मिळाले.
“रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय पोस्टानं आपली सेवा जलद करण्यासाठी घेतला असून ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे.” अशी माहिती आम्हाला लोकमतने ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत वाचायला मिळाली.
तुमच्या माहितीसाठी पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे. यासंदर्भात विभागाच्या @IndiaPostOffice या अधिकृत X खात्यावरून ६ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्ट करून माहिती देण्यात आली आहे.

दळणवळण मंत्रालयाने यासंदर्भात ६ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेले प्रगटीकरण येथे पाहता येईल.
दरम्यान रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आली आहे अशाप्रकारची चर्चा पाहायला मिळाल्याने पोस्ट खात्याने @IndiaPostOffice या अधिकृत X खात्यावरून ७ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्ट करीत याबद्दलही स्पष्टीकरण दिले आहे.
यामुळे टपाल पेट्या बंद करण्यासंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला हा दावा खोटा असल्याचे आणि भारतीय डाक विभागानेही याचे खंडन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google Search
Report published by The Hindu on August 21, 2025
Report published by Economic Times on August 6, 2025
Report published by Lokmat on August 4, 2025
X post by India Post on August 7, 2025
X post by India Post on August 6, 2025
Press release by PIB on August 6, 2025
Runjay Kumar
December 13, 2025
Vasudha Beri
December 12, 2025
Vasudha Beri
December 10, 2025