Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
Claim- लाॅकडाऊनमध्ये मशीद खुली ठेऊ दिली नाही म्हणून एमआयएम नेता वारीस पठाणने पोलिसांना धमकी दिली.

महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 56 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पठाण आणि पोलिस अधिका-यामध्ये शाब्दिक वाद होताना दिसत आहे. वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वारिस पठाण पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत शारीरिक अंतराचे पालन न करता अधिका-यांना भिडत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याविषयी दावा करण्यात येत आहे की, लाॅकडाऊनमध्ये मशीद उघडी ठेवण्यासाठी पठाण पोलिसांना धमकावत आहेत.
Verification- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला फेसबुक वर देखील याच दाव्याची पोस्ट आढळून आली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वारीस पठाण नावाचा मुसलमान आमदार भायखळा, मुंबई येथे पोलीस अधिकाऱ्याला पहा कसा दर्डावतोय !का नाही मुसलमान वस्त्यांमध्ये कोरोना पसरणार ?ही जमात स्वतः तर मरेल, सोबत दुसऱ्याला घेऊन मरेल.वढं सगळं होत असताना सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांचे रक्त कधी सळसळणार ?आमच्यामध्ये सेक्युलरिजम एवढं बिंबवले की मुसलमानाला, मुसलमान म्हणणे सुद्धा कम्यूनल झाले आहे.
याशिवाय आम्हाला महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचे सुद्धा ट्विट आढळून आले.
आम्हाला आणखी काही ट्विट आणि फेसबुक पोस्ट मिळाल्या. ज्यात हाच दावा केला आहे की लाॅकडाऊनमध्ये मशिदी उघड्या ठेवण्यासाठी एमआयएम नेते व माजी आमदार वारीस पठाण यांनी पोलिसांना धमकावले.

व्हिडिओत काय म्हणाले वारीस पठाण?
वारीस पठाण पोलिस अधिका-याशी हिंदीत बोलले आहेत त्याचा मराठी अनवाद खालील प्रमाणे- “देशमुख साहेब मी नेहमीच लाॅ अॅंड आॅर्डर आणि कायद्याचे देखील कधी उल्लंघन केलेले नाही. हे सज्जन लोक आहेत. आपल्या इथे 40 वर्षांपासून शांततेत राहत आहेत. यांना कोणी त्रास देऊ नका, मशीद बंद करण्याचा प्रयत्न कुणी करु नका, लाॅउडस्पीकर बंद करण्याचा प्रयत्न करु नका, रात्री बुट घालून घरात घुसायचं नाही. आम्ही प्रेमाने बोलणारे लोक आहोत. आम्ही कायदा मानणारे आहोत. कायद्यात राहूनच बोलतो. जर तुम्ही आमच्यावर अन्याय कराल जबरदस्ती कराल, दादागिरी कराल तर देशमुख साहेब आम्हाला आमच्या पद्धतीने सोडा, निर्णय कायद्याने होईल. आम्ही उभा राहिलो तर तुम्ही गोळ्या घाला, तुमच्यात ताकद आहेत तर आम्ही पण त्या झेलायला तयार आहोत. आणि एेका मशीद जशी चालू आहे तशी चालू राहू द्या. हाॅस्पिटल जसं चालू आहे तसं चालू द्या”.
आम्ही या संदर्भात शोध सुरुच ठेवला व्हिडिओ बारकाईने पाहिला असता या व्हिडिओमध्ये Mumbai Live चा लोगो आढळून आला. काही किवर्डसच्या साहाय्याने युट्यूबमध्ये शोध घेतला असता हा व्हिडिओ 2016 मधील असल्याचे समोर आले. 1 मिनिट 13 सेकंदाच्या या व्हिडिओ विषयी म्हटले आहे म्हटले आहे की लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवण्याच्या कारणावरुन पोलिस आणि पठाण यांच्यात वाद झाला होता.
यात पठाण म्हणतात की मशीद आणि हाॅस्पिटल जसं सुरु आहे तसं सुरु राहु द्या आपल्याला 10 वाजेपर्यंत परवानगी आहे. पुढे ते इतर लोकांना म्हणतात- तुम्ही लोकांनि कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये. हे लोक( पोलिस) आपल्याला त्रास देत नाहीत आपल्याला सपोर्ट करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे आपले कर्तव्य आहे.
याशिवाय आम्हाला पठाण आणि अधिका-यातील वादाचा 14 नोव्हेंबर 2016 चा संपूर्ण व्हिडिओ आढळून आला. जो 2 मिनिटे 16 सेंकदाचा आहे.
याशिवाय वारीस पठाण यांचे एक ट्विट देखील आढळून आले यात त्यानी म्हटले आहे की पाच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आता खोट्या दाव्याने व्हायरल होत आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की एमआयएम नेते वारीस पठाण यांनी लाॅकडाऊन मध्ये पोलिसांनी धमकी दिलेली नाही. जुना व्हिडिओ खोट्या दाव्यानिशी व्हायरल झाला आहे.
Source
Twitter Advanced Search, Facebook Search, Google Search
Result- Misleading
( कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
JP Tripathi
October 16, 2025
Raushan Thakur
October 15, 2025
Shaminder Singh
October 15, 2025