Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल...

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे.
Fact
केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप केलेली नाही. शिवाय कोणत्या राज्यात किती टप्प्यात ही निवडणूक होणार याचीही घोषणा झालेली नाही.

लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X वर हा दावा अनेक युजर्सनी केला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check/Verification

व्हायरल पोस्ट संदर्भात शोध घेण्यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत आणि नियंत्रणात होते त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणती घोषणा केली आहे का? याचा शोध घेतला. आम्ही Election Commission of India आणि Press Information Bureau च्या अधिकृत वेबसाईटवर शोधून पाहिले. मात्र लोकसभा निवडणुकीची तारीख, वेळापत्रक किंवा कोणत्या राज्यात किती टप्प्यात याची कोणतीच घोषणा झालेली नसल्याचे दिसून आले.

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: eci.gov.in

आम्ही Election Commission of India चे अधिकृत X अकाउंट धुंडाळून पाहिले. त्यावर २३ जानेवारी २०२४ रोजीची एक पोस्ट आम्हाला आढळली.

X पोस्टसोबत जोडलेल्या एका प्रेस नोटमध्ये असे म्हटले आहे की, “पत्रात तात्पुरती मतदानाची तारीख म्हणून नमूद केलेली तारीख १६.०४.२०२४ ही निवडणूक अधिकाऱ्यांनी ECI च्या निवडणूक नियोजकानुसार आवश्यक कामांची आखणी करण्यासाठी केवळ संदर्भ हेतूसाठी दिलेली होती आणि निवडणुकीच्या प्रत्यक्षात जाहीर होणाऱ्या वेळापत्रकाशी या तारखेचा काहीच संबंध नाही.” विशेष म्हणजे “निवडणूकिची घोषणा ECI योग्य वेळी करेल.” असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

याचसंदर्भातील माहिती देणारे एक ट्विटही आमच्या पाहणीत आले.

लोकसभा निवडणुकीसाठी १६ एप्रिल ही तारीख गृहीत धरून नियोजन करा, अशा आशयाच्या एका पत्राचा विपर्यास झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासंदर्भातील स्पष्टीकरण दिल्याचे दिसून आले. मात्र निवडणुकीची तारीख जाहीर केल्याचे किंवा महाराष्ट्रात ११ एप्रिल पासून निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कुठेही स्पष्टपणे म्हटल्याचे आम्हाला दिसून आले नाही.

यासंदर्भात आणखी शोध घेताना लोकमतने १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेली बातमी आमच्या निदर्शनास आली.

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: Lokmat.com

“लोकसभा निवडणुकीसंदर्भात होत असलेले दावे खोटे असून अद्याप लोकसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.” असे या बातमीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात ११ किंवा १६ एप्रिल पासून लोकसभा निवडणूक होणार असल्याचा व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप केलेली नाही. शिवाय कोणत्या राज्यात किती टप्प्यात ही निवडणूक होणार याचीही घोषणा झालेली नाही.

Result: False

Our Sources
Google search
Official website of Election Commission of India
Official website of Press Information Bureau
X post by ECI on January 23, 2024
News published by Lokmat on February 12, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular