Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे असे म्हणालेले नाहीत, शिवाय लोकमत ने असे क्रिएटिव्ह छापलेले नसून त्यांचा लोगो वापरून खोटा दावा करण्यात आला आहे.
केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्या मुसलमानांच्याच आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.
“कधी कधी यांच्या जन्मावरच शंका घेऊशी वाटते की ह्यांच्या धमण्यात नक्की ठाकरेंचंच रक्त वाहते का? उद्धव साहेब तुम्हाला इतकीच त्या लांडूळांची चाटूकारी करायची खाज आहे तर तुमची मातोश्री व महाराष्ट्रातील ठाकरे गट पक्षाच्या शाखा वक्फ बोर्डाच्या घशात घाला.” अशा कॅप्शनखाली व्हायरल क्रिएटिव्ह शेअर केले जात आहे.
वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकासंदर्भात मागील आठवड्यापासून चर्चा सुरु आहेत. याअनुषंगाने उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया असे सांगून सध्या हा दावा केला जात आहे.
व्हायरल क्रिएटिव्हच्या तपासासाठी आम्ही ते काळजीपूर्वक पाहिले. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र आणि वरच्या भागात ‘लोकमत’ असे मराठी भाषेत आणि खालच्या बाजूला ‘Lokmat .com’ असे लिहिण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. लोकमत या माध्यम समूहाने असे क्रिएटिव्ह नेमके कोठे अपलोड केले आहे, हे पाहण्याचा आपण निर्णय घेतला. सर्वप्रथम आम्ही व्हायरल क्रिएटिव्हवर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. मात्र आम्हाला क्रिएटिव्हचा मुख्य सोर्स हा याप्रकारचे व्हायरल दावेच असल्याचे आणि लोकमतचे कुठलेही सोशल मीडिया पेज किंवा अकाउंट नसल्याचे दिसून आले.

दरम्यान आम्ही लोकमत चे फेसबूक पेज, X हॅन्डल आणि अधिकृत वेबसाईटसुद्धा तपासून पाहिली. मात्र उद्धव ठाकरेंच्या नावे अशाप्रकारे कोणतेच क्रिएटिव्ह त्यांनी पोस्ट केल्याचे किंवा याविषयावर बातमी दिल्याचे निदर्शनास आले नाही.


यानंतर आम्ही शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्याही फेसबूक पेज आणि X हँडल्सवर तपासून पाहिले मात्र, उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे कोणतेही विधान केल्याचे किंवा तसे पोस्ट केल्याचे पाहावयास मिळाले नाही. शिवाय कोणत्याही इतर अधिकृत माध्यमावर याबद्दलची बातमी आम्हाला दिसली नाही. उद्धव ठाकरेंनी असे विधान केले असते तर त्याची मोठी बातमी झाली असती.
आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, “अशाप्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून अकारण बनावट गोष्टी पसरविल्या जात आहेत. वक्फ बोर्डावर बंधने घालू नका असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे धादांत खोटे पसरविले जात आहे. हा खोटारडेपणा आहे.” अशी त्यांनी माहिती दिली.
याचबरोबरीने आम्ही लोकमत डॉट कॉम चे संपादक अमेय गोगटे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकारचे क्रिएटिव्ह लोकमतने बनविले नाही आणि कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर पोस्ट देखील केलेले नाही. बनावटरित्या लोकमतच्या लोगोचा वापर करून खोटी माहिती पसरविली जात आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. या क्रिएटिव्ह मुळे होत असणारा गैरसमज दूर करण्यासाठी लोकमतने प्रसिद्ध केलेली दाव्याचे खंडन करणारी फॅक्टचेक स्वरूपातील बातमीही त्यांनी न्यूजचेकरला उपलब्ध करून दिली.

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले, असे सांगणारे क्रिएटिव्ह बनावट आहे. हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे असे म्हणालेले नाहीत, शिवाय लोकमत ने असे क्रिएटिव्ह छापलेले नसून त्यांचा लोगो वापरून खोडसाळपणा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google reverse image search
Social media handles of Lokmat
Social media handles of Shivsena(UBT)
Conversation with Shivsena PRO Harshal Pradhan
Conversation with Amey Gogte, Editor Lokmat.com
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025