Authors
Claim
इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका कारण तो ISIS शी संबंधित आहे असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.
Fact
हा संदेश एक अफवा आहे. असे कोणतेही आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलेले नाही.
इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. हा ग्रुप ISIS शी संबंधित असून त्याच्या ग्रुपमध्ये एकदा समाविष्ट झाल्यास बाहेर पडता येत नाही. असे सांगणारा एक दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही कीवर्ड सर्चच्या माध्यमातून अशाप्रकारे कोणते आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे का? हे तपासून पाहिले. मात्र आम्हाला त्यासंदर्भात कोणतेच मीडिया रिपोर्ट मिळाले नाहीत.
दरम्यान आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत X अकाउंट धुंडाळले, मात्र तेथेही अशी कोणतीही सूचना किंवा संदेश देण्यात आल्याचे तसेच आवाहन केल्याचे आमच्या पाहणीत आले नाही.
महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवरही आम्ही शोधले, मात्र अशाप्रकारचा संदेश देण्यात आला असल्याचे आम्हाला दिसून आले नाही.
दरम्यान आम्ही इंग्रजी किवर्ड्सचा वापर करून Google वर शोध घेतला. दरम्यान आम्हाला इंटरस्कुल व्हाट्सअप मेसेज हा प्रकार म्हणजे जून २०१७ पासून सुरु असलेल्या अफवेचा भाग आहे, अशी माहिती देणारे एक आर्टिकल सापडले. Snopes ने ५ जून २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या या लेखात आम्हाला ही माहिती मिळाली.
ISIS काही चुकीच्या हेतूने निरपराधांना बळी पाडण्याच्या उद्देशाने व्हाट्सअप ग्रुप चालवत असल्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही. शिवाय एकाद्या व्हाट्सअप ग्रुपमधून सदस्याला बाहेर पडण्यापासून रोखण्याची कोणती सुविधा सुद्धा अस्तित्वात नाही. अशी माहिती आम्हाला या लेखातून मिळाली.
दरम्यान आम्ही WhatsApp Help Center मध्ये जाऊन याची पडताळणी केली असता, ग्रुप मधून बाहेर पडण्याची सोय प्रत्येकाला असल्याचे पाहायला मिळाले.
आम्ही अधिक तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस महासंचालक संजय शिंत्रे यांच्याशी संपर्क साधला असता, व्हायरल होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असल्याची माहिती दिली.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल होत असलेला संदेश २०१७ पासून इंटरनेटवर फिरत असून अफवेचा भाग आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशाप्रकारचे कोणतेही आवाहन केलेले नसून दावा खोटा आहे. हे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
Google search
Social Media handles and official website of Maharashtra Police
Article published by Snopes on June 5, 2017
Conversation with DG Cyber Cell, Maharashtra Police
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा