Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact CheckViralव्हायरल होणारा संदेश खरंच महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलाय ? जाणून घ्या सत्य...

व्हायरल होणारा संदेश खरंच महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलाय ? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, रस्त्यावर आता अशी मुलं दिसतात, त्यांच्याकडे घराचा पत्ता लिहिलेला कागद असतो. ते मूल हरवल्याचा दावा करतात. 

असं जर तुम्हांला कोणी दिसलं तर मदत करू नका, हा संदेश महाराष्ट्र पोलीस यांच्या नावाने शेअर केला जात आहे. 

व्हायरल संदेश : 

*तातडीची सूचना*

सर्व पोलीस ठाण्यांपासून नागरिकांना सांगण्यात येते की , रस्त्यावर आता अशी मुलं दिसतात त्यांच्याकडे त्यांचा घराचा पत्ता लिहिलेला कागद असतो ते मूल हरवल्याचा दावा करतात.

जर तुम्हाला ही मुले दिसली तर त्यांना लिखित पत्त्यावर नेऊ नका कारण तेथे काही लोक तुमची हत्या करण्यासाठी, तुमचे शारीरिक अवयव काढून घेण्यासाठी किंवा महिलेचा बलात्कार करण्यासाठी वाट पाहत आहेत,

म्हणून तश्या मुलांना त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा जवळच्या आपत्कालीन वस्तीवर घेऊन जा. पण त्यांच्याकडे असलेल्या पत्यावर चुकूनही जाऊ नका . पाहिजे तर ताबडतोब जवळच्या पोलिस स्टेशन ला जाऊन हा प्रकार सांगा.

कृपया हे सगळीकडे प्रसारित करा. ही बाब 100% खरी आहे . काही ठिकाणी हे प्रकार घडले आहेत . म्हणून आपण चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका. उगाच नको त्या अडचणीत फसू नका.

हे तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा.

तुमचे हितचिंतक…..,

*महाराष्ट्र पोलीस*

फेसबुकवर हा संदेश अनेक युजरने शेअर केला आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

ट्विटरवर देखील हा संदेश शेअर केला जात आहे. त्या पोस्ट खाली जोडत आहे.

Fact Check / Verification

महाराष्ट्र पोलीस यांनी खरंच हा संदेश लिहिलाय की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर या संदर्भात शोधले. पण आम्हांला या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मग आम्ही ‘महाराष्ट्र पोलीस’ यांचे अधिकृत ट्विटर खाते तपासले. पण त्यावर देखील हा संदेश लिहिलेला आढळला नाही.

त्यानंतर आम्ही पुणे सायबर पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,”अशी घटना महाराष्ट्रात घडलेली नाही. हा संदेश आम्ही लिहिलेला नाही.”

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले,”अनेक जण संत, देवाच्या किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने संदेश लिहून पुढे पाठवतात. तसाच हा देखील संदेश फॉरवर्ड केला आहे, पण तो आम्ही लिहिलेला नाही.” 

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही पुणे पोलीस कमिशनरच्या पीआरओ ऑफिसशी संपर्क साधला. तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले,”हा संदेश महाराष्ट्र पोलीस यांनी प्रसारित केलेला नाही. हा खोटा संदेश आहे.”

या व्यतिरिक्त आम्ही डीजीपीच्या मुंबई ऑफिसशी संपर्क साधला. त्यांनी देखील हेच सांगितले,”आम्ही हा संदेश लिहिलेला नाही.”

हे देखील वाचू शकता : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील खरंच हे फोटो आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हा संदेश महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलेला नाही. या संदर्भात आम्हांला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Result : Fabricated Content/False

Our Sources 

फोनवरून पुणे सायबर पोलिसांशी झालेला संवाद

फोनवरून पुणे पोलीस कमिशनरच्या पीआरओ ऑफिसशी झालेला संवाद

फोनवरून डीजीपीच्या मुंबई ऑफिसशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular