Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact CheckFact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे

Fact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे

Claim
भाजप टिकले तर एक दिवस तिरंगा झेंडा चंद्रावर असेल पण काँग्रेस काही घेऊन आली तर झेंड्यात चंद्र असेल, हे नेहमी लक्षात ठेवा असे बीबीसीचे पत्रकार मार्क टुली म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. स्वतः मार्क टुली यांनी याचा इन्कार केला आहे.

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांचा काँग्रेस पक्षावर टीका करणारा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहे.

हा मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोरदार पसरत असून व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

व्हॉट्सअपवर आढळलेल्या व्हायरल मेसेजचा दावा आहे की तो “मार्क टुली” यांनी “देशाच्या हितासाठी जारी केला आहे”.

Fact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे
Whatsapp viral message

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: मार्क टुलीच्या नावावर व्हायरल भाजप समर्थक मेसेज बनावट आहे

संदेशात काँग्रेसची तुलना एका मोठ्या वटवृक्षाशी करण्यात आली असून ज्याला “मोदी उद्ध्वस्त करत आहेत”, असे म्हटलेले आहे. ते काँग्रेस, डावे, जिहादी, नक्षलवादी, मिशनरी देशाला उद्ध्वस्त करणारे “साप” असे म्हटलेले आहे. त्यांना “उघड” केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्यात आले आहे. “मोदी आपल्या देशवासियांसाठी युद्ध पुकारत आहेत” म्हणून “हिंदूंना मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागेल” असे हा संदेश पुढे सांगतो.

Fact Check/ Verification

आम्ही हा मेसेज बारकाईने वाचला. मेसेजच्या शेवटी, व्हायरल मेसेजमधील दाव्यांचा बॅकअप घेण्यासाठी पुरावा म्हणून फॅक्ट चेकिंग करणार्‍या पोर्टल Alt न्यूजच्या लेखाची लिंक जोडली गेल्याचे आमच्या निदर्शनास आले. या लिंकमधील माहिती वाचता ती मेसेज मधील मजकुराच्या विरुद्ध आढळली. Alt News च्या लेखाने मे २०१९ मध्ये Tully च्या नावाने मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला हाच खोटा दावा खोडून काढला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

न्यूजचेकरने संदेशातील अनेक शब्दांच्या संयोगांसह कीवर्ड शोध देखील घेतला. मात्र असा संदेश Tully यांनी तयार केला आहे असे सांगणारा एकही प्रामाणिक स्रोत आम्हाला मिळाला नाही.

पुढे, आम्ही मार्क टुलीशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की संदेशातील मजकूर आपल्या नावाशी चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आला आहे.

“या संदेशाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्या नावाने इतरही अनेक मेसेज चुकीच्या पद्धतीने प्रसारित झाले आहेत. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही हे जनतेला कळवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी याच्याशी पूर्णपणे असहमत आहे,” टुलीने न्यूजचेकरला दिलेल्या व्हॉइस नोटमध्ये अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मार्क टुलीचा न्यूजचेकरला प्रतिसाद

टुली १९६५ मध्ये बीबीसीमध्ये रुजू झाले आणि रेडिओ बातमीदार म्हणून त्यांच्या विशिष्ट आवाजासाठी ओळखले जात. १९९४ मध्ये ब्युरो चीफ म्हणून निवृत्त होईपर्यंत त्यांनी भारताच्या अलीकडच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना कव्हर केल्या आहेत. ते पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांचे देखील प्राप्तकर्ता आहेत.

टुली यांनी काँग्रेसचा निषेध करणारे असेच संदेश यापूर्वीही अनेकदा शेअर केले आहेत. आमच्या संशोधनादरम्यान, आम्हाला आढळले की Economic Times, Bangalore Mirror तसेच Alt news and Quint सारख्या इतर तथ्य-तपासणी करणार्‍या संस्थांनी त्यांच्यापैकी अनेक मेसेज आधीच डिबंक केले आहे.

Conclusion

मार्क टुली यांनी देशाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले पंतप्रधान असे मोदींचे कौतुक करणारा संदेश खोटा आणि बनावट आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Conversation With Mark Tully


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीने सर्वप्रथम केले होते.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular