MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याने एका विद्यार्थ्याने रत्नागिरीत आत्महत्या केल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील महेश झोरे या युवकाने आत्महत्या केली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा 14 मार्चला घेण्यात येणार होती. पण कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक निर्बंध लावले गेले.
ही परीक्षा अचानक रद्द केल्याने पुण्यात MPSC च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला. या आंदोलनात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर देखील सामील झाले. विद्यार्थ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागल्याने तसचे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने सरकारने ही परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याचे आश्वासन दिले दरम्यान परीक्षा रद्द झाल्याने युवकाने आत्महत्या केल्याची पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.


आदर्श गावकरी या वेबसाईटवर देखील ही बातमी पाहण्यास मिळाली यात म्हटले आहे की, राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर MPSC ची 14 मार्च रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात युवकानेआत्महत्या केली. महेश झोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. वाढते वय आणि एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे जात असल्याचे कारण देत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाला एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याचे शासनाने स्पष्ट केले. याच गोष्टीचे नैराश्य महेशच्या मनात होते. अखेर राहत्या घरातच त्याने गळफास घेऊन आपली जीवननात्रा संपवली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावातली ही घटना आहे. आत्महत्या करण्याअगोदर महेशने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये परीक्षा पुढे जात आहे, म्हणून मी आत्महत्या करतो आहे, असे या तरूणाने सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे.

Fact check / Verification
राज्यात 14 मार्च रोजी होणारी MPSC ची परीक्षा रद्द झाल्याने खरंच रत्नागिरीतील युवकाने आत्महत्या केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला मागील आठ दहा दिवसांतील बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही महेश झोरे या नावाचा किवर्ड वापरुन शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझा ची 29 नोव्हेंबर 2020 ची बातमी आढळून आली.

या बातमीत म्हटले आहे की,कोरोना संकटाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेश झोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
महेश झोरे हा अत्यंत मेहनती मुलगा होता. आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी महेश कोर्ले इथल्या गावाकडच्या घरी आला होता. महेशला स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे होते. त्यासाठी तो आपल्या गावाकडच्या घरी मनलावून अभ्यास करत होता. एकटा राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा कोर्ले इथल्या घरी नेहमी जात होते.
गुरुवारी महेशचे आजोबा कोर्ले इथल्या घरी आले त्यावेळी महेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महेशच्या आजोबांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला. पण महेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. यात एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते. लांजा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संदर्भात माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे.
काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत?
कोरोनामुळं स्पर्धा परीक्षांच्या तारखा सतत पुढे जात आहेत. याचाच ताण महेशच्या मनावर आला. याच नैराश्यातून महेशनं टोकाचं पाऊल उचलत थेट आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. गळफास घेण्यापूर्वी महेशनं लिहिलेल्या चिठ्ठीत महेशनं हे सारं लिहून ठेवलं आहे. या घटनेनं साऱ्या परिसरात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Conclusion
आमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, महेश झोरे नावाच्या युवकाने MPSC ची परीक्षा पुढे ढकल्याने 28 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली होती. मार्च 2021 मध्ये त्याने आत्महत्या केल्याचा दावा चुकीचा आहे. 11 मार्च रोजी परीक्षा पुढे ढकलल्याने एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले पण या आंदोलना दरम्यान किंवा त्यानंतर परीक्षा पुढे ढकलल्याच्या कारणावरुन कुणी आत्महत्या केलेली नाही कारण लगेच 21 मार्च रोजी परीक्षा घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल व्हायरल होणा-या चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेऊ नये.
Result- Misleading
Our Sources
एबीपी माझा- https://marathi.abplive.com/news/suicide-of-a-youth-in-ratnagiri-due-to-repeated-postponement-of-mpsc-exams-832965
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.