Authors
Claim
राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत.
Fact
हा दावा खोटा आहे. मेसेज बरोबर देण्यात आलेली लिंक स्कॅमचा एक भाग असून धोकादायक आहे.
राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
“22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या स्थापनेनिमित्त मोदी आणि योगी संपूर्ण भारताला 3 महिन्यांसाठी ₹ 749 चे मोफत रिचार्ज देत आहेत. तर आता खालील निळ्या लिंकवर क्लिक करून तुमचा नंबर रिचार्ज करा. https://mahacashhback.in/” असे व्हायरल मेसेजच्या माध्यमातुन सांगण्यात येत आहेत.
सध्या राम मंदीराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक संदेश येऊ लागले असून याच क्रमाने अनेक युजर्स हा मेसेज व्हायरल करीत आहेत.
Fact Check/Verification
व्हायरल मेसेज संदर्भात जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर शोध घेतला. काही कीवर्डस च्या माध्यमातून आम्ही शोधले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशाप्रकारे फ्री रिचार्ज योजना सुरु केली असती तर त्याबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र आम्हाला तसा एकही मीडिया रिपोर्ट आढळला नाही.
दरम्यान आम्ही याबद्दलची घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे का? हे पाहण्यासाठी त्यांची X खाती शोधली.
मात्र या योजनेबद्दल संबंधित दोघांनीही कोणतीही घोषणा केली असल्याचे आम्हाला दिसले नाही.
व्हायरल मेसेजमध्ये आम्हाला फ्री रिचार्जसाठी https://mahacashhback.in/ या लिंकवर क्लिक करा असे लिहिण्यात आले असल्याचे आढळले. दरम्यान अशा लिंक संदर्भातील धोका ओळखून आम्ही अशा धोकादायक वेबसाइटबद्दल माहिती देणाऱ्या www.scam-detector.com या वेबसाईटवर संबधित लिंक संदर्भात काही माहिती मिळते का? हे शोधले.
https://mahacashhback.in/ ही वेबसाईट विश्वासाच्या दृष्टीने सर्वात कमी रेटिंग दर्शवित असल्याचे आम्हाला निदर्शनास आले आहे. स्कॅम डिटेक्टरने या साईटला शून्य रेटिंग दिले आहे.
अतिधोक्याची, फसवणूक करणारी आणि सावधानता बाळगण्याची गरज असणारी असे रेटिंग या साईटला देण्यात आलेले असून ते वरील इमेज मध्ये पाहता येईल. अशी वेबसाईट उघडणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देणे असल्याचेही स्कॅम डिटेक्टरने सांगितल्याचे आमच्या निदर्शनास आले.
यावरून आमच्या तपासात सदर मेसेज खोटा असल्याचे आणि त्यासोबत वापरण्यात आलेली लिंक युजर्ससाठी अतिशय धोकादायक असल्याचे दिसून आले आहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत, हा दावा खोटा असल्याचे आणि मेसेज बरोबर देण्यात आलेली लिंक स्कॅमचा एक भाग असून धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Google Search
X Accounts of PM Modi and Uttar Pradesh CM Yogi Aadityanath
Search Results on Scam Detector
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा