Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय...

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
युनायटेड किंगडमच्या राणीने इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रित केले.
Fact
डेन्मार्कच्या महाराणी मार्ग्ररेट II यांच्या अधिकृत डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती त्यांच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने होती. व्हायरल चित्रे याच कार्यक्रमाची आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजघराण्यातील भेटीचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. काही युजर्स असा दावा करत आहेत की हे चिन्हांकित करते की भारताच्या पंतप्रधानांना युनायटेड किंगडमच्या राणीने आयोजित केलेल्या मेजवानीचे आमंत्रण मिळाले. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांना ब्रिटनच्या राजवाड्यात आमंत्रित करण्यात आल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काँग्रेसवाले नेहमीच नेहरू आणि गांधी घराण्याचे बिगुल वाजवत असतात. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच युनायटेड किंगडमच्या राणीने भारताच्या पंतप्रधानांना आपल्या राजवाड्यात मेजवानीसाठी आमंत्रित केले आहे. हे देखील विचारात घेण्यासारखे आहे की राजघराण्याला त्याच्यासोबत फोटो काढल्याचा अभिमान आहे. ही केवळ पंतप्रधान मोदींसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.

हा दावा X (पूर्वी Twitter म्हणून ओळखला जाणारा) आणि Facebook वर व्हिडिओंसह इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील शेअर केला आहे.

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Facebook/ M Saravanakumar Nadar

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओची वस्तुस्थिती तपासण्यासाठी, आम्ही Google रिव्हर्स इमेज आणि कीवर्ड शोध घेतला. या प्रक्रियेदरम्यान, आम्हाला 4 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले अनेक मीडिया रिपोर्ट्स आढळले. ज्यात असे सूचित होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, डेन्मार्कच्या राणी मार्गरेट II कडून प्रतिष्ठित कोपनहेगनमधील अमालियनबोर्ग पॅलेस येथे त्यांचे सौहार्दपूर्ण स्वागत करण्यात आले.

व्हिडिओच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला 4 मे 2022 चे ANI, CNN-News18 आणि हिंदुस्तान टाईम्सचे व्हिडिओ न्यूज रिपोर्ट्स सापडले. या बातम्यांनुसार व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींची कोपनहेगन मध्ये डेन्मार्कच्या राणी मार्गरेट II सोबत भेट झाल्याचे दिसत आहे. आम्हाला आढळून आले आहे की वृत्तपत्रांमध्ये दिसणारे व्हिडिओ व्हायरल व्हिडिओसारखेच आहेत.

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: YouTube Channels (ANI, Hindustan Times, CNN News18, The Indian Express)

आम्हाला 4 मे 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या X हँडलने पोस्ट केलेले भेटीचे अनेक फोटो देखील सापडले. ज्याला पुढील कॅप्शन दिली आहे, “Met Her Majesty, the Queen of the Kingdom of Denmark, Margrethe II in Copenhagen,”

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एक्स हँडलने फोटो पोस्ट केले आहेत आणि लिहिले आहे, “Prime Minister @narendramodi met Her Majesty, the Queen of the Kingdom of Denmark, Margrethe II in Copenhagen.”

आम्हाला 4 मे 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या युरोप भेटीच्या अनेक बातम्या सापडल्या. त्या इथे, इथे आणि इथे पाहता येतील.

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: The Economic Times, ANI & The Times of India

अगदी प्रेस इन्फॉर्मेशन ऑफ इंडियानेही याच कार्यक्रमावर एक प्रेस नोट अपलोड केली होती. हीच बातमी डेन्मार्कच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे. बातमी येथे पाहता येईल.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी 2015 मध्ये यूकेला भेट दिली होती आणि ती बातमी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.

जेव्हा आपण गुगलवर “बकिंगहॅम पॅलेस येथील प्रथम भारतीय पंतप्रधान” असे सर्च करतो तेव्हा आपल्याला अनेक फोटो दिसतात. येथे आपण पाहू शकतो की ब्रिटीश सम्राटाने भारतीय पंतप्रधानांचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच घटना नाही. 1969 मध्ये राणी एलिझाबेथ यांनी पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांचे बकिंगहॅम पॅलेसमध्ये स्वागत केले होते.

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Alamy.com

त्याच शोधात, आम्हाला आढळले की जवाहरलाल नेहरू, डेन्मार्कला भेट देणारे पहिले पंतप्रधान होते. या भेटीचे छायाचित्र येथे पाहता येईल.

Fact Check: ब्रिटनच्या रॉयल पॅलेसला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना डेन्मार्कच्या राणीने होस्ट केले आहे, यूकेच्या राणीने तिच्या रॉयल पॅलेसमध्ये नाही. याव्यतिरिक्त, युनायटेड किंगडमच्या राणीद्वारे आमंत्रित करण्यात येणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत हे विधान चुकीचे आहे, कारण इंदिरा गांधी यांना 1969 मध्ये त्यांच्या पंतप्रधानपदाच्या वेळी राणी एलिझाबेथ यांनी देखील होस्ट केले होते.

Result: False

Our Sources
Facebook profiles of Ramakrishnan G
X Profiles of Prime Minister India, Narendra Modi, Ministry of I&B
Youtube Pages of ANI, CNN, Hindustan Times


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी रंगमन दास यांनी सर्वप्रथम केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular