मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील skyTran कंपनी विकत घेतली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, भारतीय उद्योगपति आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील सर्वात मोठी आयटी कंपनी skyTran विकत घेतली आहे. या कंपनीने पॉड टॅक्सी चालविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
हा दावा हिंदी भाषेत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमेरिका कि सबसे बड़ी आईटी कंपनी स्काईट्रान को अंबानी ने खरीदा लिया है, लो चमचों अमेरिका भी बिकने लगा,खरीदने वाले भारतीय है।” मराठी अनुवाद- अमेरिकेतील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी skyTran अंबानी यांनी खरेदी केली आहे. बघा चमच्यानों आता अमेरिका देखील विक्रीला निघाला खरेदी करणारे भारतीय आहेत.

हा दावा फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेकडो यूजर्सनी ही पोस्ट शेअर केली आहे. CrowdTangle वर मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरवर @AmarNath119 या ट्विटर हॅंडलवर ट्विटला सर्वात जास्त लाईक्स मिळाले आहे. ट्विटरवरील पोस्ट्स इथे पाहू शकता. तर फेसबुक वर Subodh Sharma नावाच्या फेसबुक पेजवरील पोस्टला सर्वात जास्त लाईक्स मिळालेले आहेत

Fact Check/Verification
व्हायरल दाव्याचे सत्य शोधण्यासाठी आम्ही Google वर काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला या दाव्याशी संबंधित लेख Live Mint आणि Business Standard सह इतर माध्यमांत देखील आढळून आले. हे लेख 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकाशित झाले आहेतय या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकन कंपनी skyTran काही टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.

आम्ही यासंदर्भात अधिक तपास सुरु केला आणि skyTran च्या आणि रिलायन्सच्या कराराची संपूर्ण माहिती गोळा करण्यास सुरवात केली. यावेळी आम्हाला नवभारत टाईम्स या हिंदी वेबसाईटवरील 1 मार्च 2021 रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार ऑक्टोबर 2018 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने स्कायट्रानमधील 12.7% साठा खरेदी केला आहे.
त्यानंतर, नोव्हेंबर 2019 मध्ये रिलायन्सने आपला हिस्सा वाढवून 17.37 टक्के केला. एप्रिल 2020 मध्ये रिलायन्सने आपला वाटा 26.3 केला होता. तो आता वाढून 54. 46 टक्के झाला आहे.

यान् अधिकृत वेबसाईटल भेट देऊन आम्ही या दाव्याची तपासणी केली. येथे आम्हाला रिलायन्सने 28 फेब्रुवारी 2021 जारी केलेले एक प्रसिद्धीपत्रक मिळाले. यात म्हटले आहे की रिलायन्सने skyTran समभागातील हिस्सा 54..46 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आम्हाला रिलायन्सच्या वेबसाईटवर skyTran कंपनी खरेदी केल्याचा उल्लेख कुठेही आढळून आला नाही.

Conclusion
आमच्या तपासणीत सापडलेल्या तथ्यानुसार, रिलायन्सने अमेरिकन कंपनी स्कायट्रान खरेदी करण्याचा दावा खोटा आहे. मुकेश अंबानी यांनी अमेरिकन आयटी कंपनी स्कायट्रान घेतली नाही. त्याऐवजी रिलायन्सने स्कायट्रॅन कंपनीत आपला हिस्सा वाढविला आहे. 2018 पासून रिलायन्सचा स्कायट्रॅनच्या स्टॉकमध्ये हिस्सा आहे, जो रिलायन्सकडून सतत वाढविला जात आहे.
Read More : शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का?
Result: Misleading
Claim Review: मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील skyTran कंपनी विकत घेतली Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
Our Sources
Business Standard – https://www.business-standard.com/article/companies/ril-arm-acquires-majority-stake-in-us-tech-firm-skytran-for-27-mn-121022800740_1.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.