Authors
Claim
उत्तनच्या किनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडलेली महिला लव्ह जिहादची शिकार आहे.
Fact
चारित्र्याच्या संशयावरून त्या महिलेचा पतीनेच खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात कोणताही कम्युनल अँगल नाही.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका पिशवीत सापडलेल्या शीर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक कम्युनल दावे होऊ लागले आहेत. युजर्स या मृतदेहाचे फोटो शेयर करून या घटनेला धार्मिक रंग देऊ लागले आहेत.
या दाव्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येऊ शकते.
अशाप्रकारे या घटनेला धार्मिक रंग देणारे अनेक दावे आमच्या पाहणीत आले आहेत. दाव्याच्या मते सुटकेसमध्ये सापडलेली महिला हिंदू आहे. तिला पर धर्मातील व्यक्तीने ठार केले असा एकंदर अंदाज युजरनी बांधला आहे. यामुळे हे दावे जास्तितजास्त व्हायरल होत आहेत.
Fact Check/ Verification
हातावर त्रिशूळ गोंदलेल्या महिलेचा फोटो, शेजारी तिचा मृतदेह ज्या बागेत सापडला ती सुटकेस अशी छायाचित्रे सापडल्याने आम्ही याबतीत तपास केला. आम्ही गुगलवर ‘ठाणे जिल्ह्यात सुटकेसमध्ये आढळला मृतदेह’ अशा किवर्ड च्या माध्यमातून शोधले असता, आम्हाला मुंबई तरुण भारत ने ३ जून रोजी प्रकाशित केलेली एक बातमी सापडली.
या बातमीत आम्हाला २ जून २०२३ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेची संपूर्ण माहिती वाचायला मिळाली. “उत्तन या सागरी भागात हा महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला. मृतदेहाच्या एका हातावर त्रिशूल आणि डमरू गोंदलेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
घटनेसंदर्भात आणखी शोध घेत असताना, आम्हाला ४ जून रोजी याच घटनेसंदर्भात करण्यात आलेले एक ट्विट पाहायला मिळाले.
“ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये शुक्रवारी (2 जून) समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद सुटकेस आढळला होता . ज्यामध्ये एका अज्ञात महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. याच प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावून आरोपी महिलेचा पती मिंटू सिंह व दिर चूनचुन सिंह रा. बिहार यांना अटक केली” अशी माहिती आणि पोलिसांचे फोटो आम्हाला पाहायला मिळाले.
आम्ही यासंदर्भात खातरजमा करण्यासाठी आम्ही पुन्हा शोध घेतला. आम्हाला लोकसत्ताने प्रसिद्ध केलेले एक वृत्त सापडले. यामध्ये पोलिसांनी त्या महिलेच्या खुनाचा छडा लावल्याची आणि तिचा खून करणाऱ्या तिच्या पतीला व दिराला अटक केल्याची माहिती आम्हाला मिळाली.
अंजली सिंग नामक त्या महिलेचा पती मिट्टू सिंग आणि त्याचा भाऊ चुनचून सिंग यांनी खून केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान अंजली हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन पतीनेच तिचा काटा काढला असल्याचे आमच्या पाहणीत आले. यासंदर्भात प्रसिद्ध झालेले आणखी मीडिया रिपोर्ट्स आपण येथे आणि येथे वाचू शकता.
अशाप्रकारे आमच्या तपासात मयत अंजली ही महिला हिंदू असून तिचा खून करणारा तिचा पती आणि दीर हे दोघेही इतर कोणत्याही धर्माचे नसून हिंदूच असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
उत्तनच्या किनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाशी कम्युनल अँगल आहे, असा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचा खून तिच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून केला असून त्याला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
Result: False
Our Sources
News published by Mumbai Tarun Bharat on June 3, 2023
Tweets made by @Adilshaikh2483 on June 4, 2023
News published by Loksatta on June 3, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in